*१६ ते १८ डिसेंबरला महानिर्मिती तंत्रज्ञ-३ ऑनलाइन परीक्षा*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधि -दिलीप येवले
७४६ जागांकरिता ५९८९३ उमेदवार
राज्यातील १९ शहरांत ४२ उपकेंद्रांवर परीक्षा
परीक्षा वेळ सकाळी १० ते ११.३०, दुपारी २ ते ३.३०
महानिर्मितीच्या संकेतस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, ठिकाण व वेळेबाबत माहिती
प्रवेशपत्र माहिती एस.एम.एस. आणि ई-मेलवर दिली
महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्रमांक ०४/२०१९ अन्वये सरळ सेवा प्रवेशद्वारे भरण्यात येणाऱ्या “तंत्रज्ञ-३” या पदांची ऑनलाइन परीक्षा १६ ते १८ डिसेंबर रोजी राज्यातील १९ शहरांतील ४२ उपकेंद्रांवर घेण्यात येणार असून मुंबई, पुणे,नाशिक,जळगाव,भुसावळ, धुळे,बीड,लातूर,नांदेड, औरंगाबाद, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ,रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या शहरात प्रामुख्याने घेण्यात येणार आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन आवेदन करतेवेळी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र लिंक व भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रवेशपत्र माहितीचा संदेश पाठविण्यात आला आहे. तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याविषयीची लिंक महानिर्मितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षेसंदर्भात उमेदवारांना कुठलीही अडचण आल्यास agmhrrcqueries@gmail.com या ई-मेलवर उमेदवारांनी संपर्क साधल्यास त्याचे निरसन करण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रवेश पत्राच्या दोन प्रती प्रिंट करून ठेवाव्या, एक प्रत परीक्षा केंद्रावर द्यावी व एक प्रत स्वत:कडे ठेवावी. रस्त्यावरील वाहनांची वाढती गर्दी, ट्राफिक जाम इत्यादी गोष्टी लक्षात घेता उमेदवारांनी परीक्षेच्या नियोजित वेळेच्या एक तास अगोदर सुरक्षित परीक्षा केंद्रात हजर राहावे, जेणेकरून गैरसोय निर्माण होणार नाही.
तंत्रज्ञ-३ या पदाच्या पदभरतीबाबत करण्यात येणारी कार्यवाही जसे ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, सराव प्रश्नावली, ऑनलाइन परीक्षा तारीख व इतर संबंधित माहिती वेळोवेळी महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
संपूर्ण भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शकपणे केली जाते. उमेदवारांनी त्यांना कोणीही व्यक्ती, महानिर्मिती कंपनीत नोकरी मिळवून देतो असे आश्वासन देत असल्यास त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आणून दिल्यास महानिर्मितीतर्फे तातडीने उचित कारवाई करण्यात येईल असे महानिर्मितीच्या सूत्रांनी कळविले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज