*शिवराज्याभिषेक दिनी भव्य आयोजन*

सावनेर ः महाराष्ट्र राज्य शासनाच्या दिशानिर्देश व मा. मंगल प्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार उद्दोजगता व नाविन्यता मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संकल्पनेने दि.6 जुन 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यांच्या हस्ते स्व. अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे व्हिडीओ काँन्फ्रेंसींग व्दारे आँनलाईन पध्दतीने होणार असून सदर आयोजनास वैभव देवघरे, शैलेश ढबाले, शिवचरित्र अभ्यासक व शिव व्याख्याते, मदन डहाके मुख्याध्यापक जवाहर विद्यालय वाकोडी, किशोर ढुंढेले अध्यक्ष सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ, हितेश बनसोड संस्थापक हितज्योती आधार फाउंडेशन, भुषण कुबडे पर्यावरण मीत्र व जलतारा स्वयंसेवक आदी मान्यवर स्वदेशी विचारांचा प्रसार, नागरी कर्तव्य व.शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन,सामाजिक समरसता, पर्यावरण समरस्ता आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.*

*सदर आयोजनास आयएमसी अध्यक्ष संजय भोंगे, आयएमसी उपाध्यक्ष प्रेमचंद पाटील, आयएमसी सदस्य सोनु रावसाहेब, वैभव चांडक, श्रीमती गीता लोधी, अँड् तेजस कुबिटकर, प्रशांत मडावी, अँड् मनोज खंगारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या सदर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या यशस्वीते करीता स्व. अण्णाजी कुबिटकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर चे प्राचार्य प्रशांत नांदुरकर,गटनिदेशक घ्यार सर , सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी परिश्रम घेत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज