*अँड्.मनोज खंगारे व अँड्. तेजस कुबिटकर यांची आयएमसी सदस्य पदी नियुक्ती*
सावनेर: शहरातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अँड्. मनोज खंगारे आणि अँड्. तेजस कुबिटकर यांना महाराष्ट्र सरकारने स्व. अण्णाजी कुबिटकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर आयएमसी सदस्य म्हणून नियुक्ती.

*अँड्. मनोज खंगारे आणि तेजस कुबिटकर यांच्या नियुक्तीबद्दल, आयएमसी अध्यक्ष संजय भोंगे, दिवंगत अण्णाजी कुबिटकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, सावनेर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.*
*आयएमसी सदस्यांच्या नियुक्तीबद्दल, सामाजिक कार्यकर्ते आणि जवाहर कन्या विद्यालय वाकोडीचे मुख्याध्यापक मदन डहाके, सावनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडेले, पर्यावरण प्रेमी तसेच जलतारा स्वयंसेवक भूषण कुबडे, शिवचरित्र व्याख्याते शैलेश ढबाळे, युवा उद्योजक आणि आयएमसी सदस्य सोनू रावसाहेब, स्व. अण्णाजी कुबिटकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर चे गट निदेशक भोयर सर, लोही सर, घनश्याम. कटरे, हरीश बुरे आदी यांनी नवनियुक्त आयएमसी सदस्य अँड्. मनोज खंगारे आणि तेजस कुबिटकर यांचे अभिनंदन केले.*
Maharashtra News Media सच की आवाज