हिरापूर येथे विविध सिमेंट कॉक्रेट रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न

*आवारपूर प्रतिनिधी -गौतम धोटे*
आवारपूरःयेथूनच जवळ असलेल्या हिरापूर येथे दिनांक 14.12.2019 रोज शनिवार वेळ सकाळी 9.30 वाजता हिरापूर येथे अंतर्गत सिमेंट कॉक्रेट रस्त्याचे भूमिपूजन विविध फ़ंडातून पार पडले. यात आमदार स्थानिक विकास निधी सन 2019-2020 ,ग्रामीण विकास निधी 2515,सि .एस .आर निधी अश्या विविध निधीतून हे मंजूर रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे.

यासाठी हिरापूर ग्राम पंचायतीने पुढाकार घेऊन या सदरील कामांकरिता वारंवार समबंधीत विभागाकडे सरपंच प्रमोद छ.कोडापे यांनी सतत पाठपुरावा करून सिमेंट कॉक्रेट रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून आणला .
यासाठी राजुरा विधानसभेचे माजी व तत्कालीन आमदार श्री.संजयभाऊ धोटे यांनी हिरापूर येथील नागरिकांची अंतर्गत कॉक्रेट रस्त्याची मागणी लक्षात घेऊन त्यांनी हिरापूर गावाला आमदार स्थानिक विकास निधी 2019-20 मधे 7 लक्ष रु.व ग्रामीण विकास निधी अंतर्गत 7 लक्ष व अल्ट्राटेक सिमेंट वेल्फेअर फाउंडेशन आवाळपुर यांनी 5 लक्ष रु सि .एस .आर निधी पाठपुराव्यानुसार उपलब्ध करून दिला .
नागरिकांची बऱ्याच वर्षांपासून असलेली प्रलंबित मागणी ही पूर्ण होत असून गावातील अंतर्गत रस्ते ग्रामस्थांच्या ये -जा करणे करीता योग्य व सोईचे होनार असून हिरापूर ग्रामस्थांकडून आंनद व्यक्त केल्या जात आहे.
यावेळी उद्घाघटक सरपंच प्रमोद कोडापे,अल्ट्राटेकचे विकास अधिकारी श्री.संजय जी पेटकर,श्री.सतीश मिश्रा, त .मु. अध्यक्ष श्री. विशाल पावडे,ग्राम .प .सदस्या शांताबाई टिपले,ग्रामसेवक श्री.सुभाष ताजने,पो.पा. योगिता टिपले,माधवजी वाघमारे ,नानाजी लोंढे ,गंगाधार मडावी ,सुधाकर बोढे,प्यारेलाल वाघमारे,अरुण काळे,विलास काळे,भास्कर विधाते, संजय बोढे ,सोमेश्वर जोगी,सुवर्णा सिडाम,रविताताई शिलारकर भाऊजी बोढे ,देविदास मांदाळे ,गिरजनाथ खानके ,सोनेराव सिडाम, सूरज आत्राम बहुसंख्य हिरापूर ग्रामस्थ उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज