Breaking News

*आईसर च्या धडकेत नऊ जनावरे मृत्युमुखी व पाच जखमी* *संतप्त गावकऱ्यांनी केला राज्य महामार्ग बंद*

*आईसर च्या धडकेत नऊ जनावरे मृत्युमुखी व पाच जखमी*

*संतप्त गावकऱ्यांनी केला राज्य महामार्ग बंद*

सावनेर ः तालुक्यातील केळवद पोलिस स्टेशन हद्दीतील नांदागोमुख पासून तीन किलोमीटर अंतरावरील सतरापूर या गावातून गाव गोहना मधील गुरेढोरे गुराखी चारायला नेत असताना सतरापूर गावाला लागूनच असलेला सावनेर बैतूल या राज्य महामार्गावर आज सकाळी 11 वाजता बैतूल कडून नागपूरला जाणारा आयशर क्रमांक आर जे 39 जीए 3189 या वाहनाने मागेपुढे न पाहता जोरदार धडक दिली त्या धडकेमध्ये नऊ जनावरे जागीच मृत्युमुखी पडले तर पाच म्हशी व गाई जागेवरच गंभीर जखमी झाले*


*सदर वार्ता गावात समजतात घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी व गावकरी लोक जमा झाले व काही वेळ तिथे रस्ता रोको करण्यात आला उपविभागीय पोलीस अधिकारी मस्के सावनेर, व केळवद पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत, पीएसआय राठोड साहेब, बीट जमादार नागरे यांनी ताबडतोब येऊन चोक बंदोबस्त ठेवला जोपर्यंत आमदार साहेब येणार नाही तोपर्यंत रस्ता रोको सुरू ठेवू अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतली परंतु काही वेळातच क्षेत्राचे आमदार डॉ. आशिष देशमुख,भाजपचे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मनोहर कुंभारे, समाजसेवी भुषन कुबडे, पवन जामदार आदिंनी घटनास्थळी पोहचुन लोकांची समजूत घालून काही लोकांनी तेथे उड्डाणपूला ची मागणी केली*

*शासनाकडे मी उड्डाणपुलाची मागणी करतो असे आश्वासीत करत रस्ता पूर्व सुरू केला*


*हदर दुर्घटनेत उमराव ढोके, संजय ढोके, प्रेम राज कोल्हे, वासुदेव वाडी, हेमराज शेंद्रे, देवमन कोल्हे अशा अनेक लोकांच्या मालकीचे जनावरे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांमध्ये अनेक मालकांचा समावेश असून गावकऱ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.त्यांना त्यांच्या जनावरांचा त्वरित मोबदला मिळावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *