*महिलेचा मु्तदेह कुजक्या अवस्थेत आढळला*
*सावनेर पोलिसांनी तपास घेतला हाती*
*फाँरेन्सिंक टीम ला पाचारण*

सावनेरः सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाटणसावंगी पोलिस चौकी हद्दीतील सावरमेंढा या गावाच्या शिवारात असलेल्या नाल्यालगतच बांधावर शेतात एका महिलेचे शव कुजक्या अवस्थेत आढळले आहे. तीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे असा प्राथमिक अंदाज असुन दोन ते तीन दिवस पासून प्रेत त्या ठिकाणी पडून असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असुन. मृतक महिलेची ओळख अद्याप पटली नाही.

मृतकाचे अंगावरील कपड्यावरून मृतक महिला आहे असे दिसून येत असले तरी शंका व्यक्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, सावनेर पोलीस आणि फॉरेन्सिक ची टीम यांनी घटनास्थळ पाहणी केली आहे.हितज्योती आधार फाऊंडेशन सावनेर चे हितेश बनसोड आणि हितज्योती टीमच्या मदतीने मुतकाच्या शवाला मेयो रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविले आहे.*


*उत्तरीय तपासणीत मु्तक महिला गरोदर*
*मुतक महिलेचे वय अंदाजे 30-32 च्या घरात असुन तीने परिधान केलेल्या कपडे व ब्रांडेड जोड्यावरु सदर महिला संभ्रात परिवारातील आसल्याचा अंदाज असुन. सदर हत्या कोणत्या कारणांमुळे झाली हे अद्यापही कोड्यात असले तरी सदर घटना प्रेमप्रकरणातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी पोलीस तपासातून ते निश्पन्नास येईलच.तत्पूर्वी मु्तकेच्या शवविच्छेदनातून ती गरोदर असल्याची माहिती उघडकीस येत आहे.*
*सावनेर पोलीस उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर ठाणेदार उमेश पाटील व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.*
Maharashtra News Media सच की आवाज