*विर बाबुराव सेडमाके जनजागरण,आरोग्य व हस्तकला स्पर्धा संपन्न*
अहेरी प्रतिनिधी-श्रीकांत दुर्गे
अहेरीःउप पोलिस स्टेशन पेरमिलीचा वतीने 15/12/2019 रोजी 11:00 वा. मौजा चौडमपली येथे वीर बाबुराव सेडमाके जनजागरण व आरोग्य तसेच हस्तकला स्पर्धा घेण्यात आली
सदरकार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉ.तुरकर सा आरोग्य अधिकारी पेरमिली, उदघाटक बंडू आञाम सदस्य चौडमपली, शिल सा. मंडळ अधिकारी पेरमिली, पोलीस निरीक्षक पासवान सा CRPF. पेरमिली, प्रमुख पाहुणे निमजे सा सचिव आरेंदा, एन.एन. सडमेक येरमनार, कु. तोडसाम मँडम तलाठी पेरमिली मौजा चौडमपली व आरेंदा गावातील 150 ते 200 लोक उपस्थित होते.
सदर मेळाव्यात मान्यवरांनी मेळाव्याचे उददेश विविध योजनांची माहिती दिली, गरिब BPL धारक विधवा महिला वयोवृद्ध महिला यांना साडी, ब्लँकेट, शाळकरी मुलांना नोट बुक,हँन्डवाँश दिले तसेच युवकांना व्हाँलीबाँल नेट वाटप करण्यात आले.जि.प.शाळेचे विद्यार्थीचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. आदर्श शिक्षकाचे शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली च्या वतीने आरोग्य शिबिर घेवून मधून सीकलसेल, मधुमेह, मल्लेरिया,हिवताप, असे 53 रुग्णांची तपासणी करून औषध गोळा वाटत केले. तसेच मौजा चौडमपली गावातील लोकांना तहसिल कार्यालयाच्या वतीने 5 जातीचे दाखले, सात बारा, उत्पन्नाचे दाखले देण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये 150 ते 200 स्ञी- पुरुष उपस्थित होते. कार्यक्रम संपताच उपस्थित जनसमुदायास सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
Maharashtra News Media सच की आवाज