Breaking News

*नगराध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत* *पोस्टरबाजीला उधाण*

*नगराध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत*

 

*पोस्टरबाजीला उधाण*

सावनेर– नगराध्यक्षपद व प्रभाग आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकीय वातावरणात चढाओढ सुरू झाली आहे. यंदा हे पद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने तसेच नुकतेच विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार आमदार निवडून आल्याने निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.

*या पार्श्वभूमीवर पारिवारिक, सामाजिक व व्यवसायीक कार्यातून नाव कमावलेल्या अनेकांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहे.व त्याअनुषंगाने शहरात तसेच फेसबुक, वाँटसप, इंन्स्ट्राँग्राम वर हवसे गवसे नवस्यांनी जबरदस्त पोस्टरबाजीला उधान आनले असुन बस तोच स्वताला खरा समाजसेवी, तोज खरा शहराचा हितैशी, तोच खरा विकासचा महामेरू दाखविण्याचा प्रयत्न करत लोकांचा हासा फुलवत आहे.परंतु “ये पब्लिक है, जो सब जानती है.*

*सध्यास्थीतीत चर्चेत असलेली नावे*

*नगराध्यक्ष पद सर्वसामान्य महिलेसाठी राखीव असल्याने, सर्व पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी एक मजबूत आणि ओळखण्यायोग्य महिला उमेदवार शोधण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सुमारे अर्धा डझन उमेदवार महिला उमेदवारांसह पुढे येत आहेत. त्यापैकी, भारतीय जनता पक्षाकडून, तालुकाध्यक्ष मंदार मंगळे यांच्या पत्नी सौ.संजना मंदार मंगळे, भाजप शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक भीमराव उर्फ ​​राजू घुगल यांच्या पत्नी सौ वनीताई घुगल,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व चिकित्सक डॉ. विजय धोटे यांच्या पत्नी डॉ. जोत्स्ना धोटे, माजी नगरसेवक आणि व्यापारी तुषार उमाटे उर्फ ​​बंटी महाजन यांच्या पत्नी सौ. सोनाली ताई उमाटे आदिंच्या नावची जोरदार चर्चा असली तरी वेळेपर्यंत कोण कुणाचा गेम करेल, कुठे कुणाचा गेम होईल हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.कारण भारतीय जनता पक्षाला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील मतदात्यांनी भरगोस मतदान केले होते व त्याच मतदानाच्या भरोश्यावरच भारतीय जनता पक्षाचा फुगा फुगला असुन त्यांचे हौसले बुलंद दिसत असल्याने पक्षाचे प्रामाणिक व निवडणूक व निवडणुकीनंतर आयातीत कार्यकर्त्यांनानगराध्यक्ष व नगर सेवक पदाकरिता तिकीट प्राप्तीचे डोहळे लागले आहे*
*क्षेत्राचे पुर्व आमदार सुनील केदार सद्यातरी होछ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत इंट्रेस्टेड दिसुन येत नसल्याने सध्यातरी या निवडणुकीची धुरा नवखे खासदार श्यामकुमार बर्वे सांभाळत आहेत.अश्यात काँग्रेसकडून युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज बसवार यांच्या पत्नी शिल्पाताई बसवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. साहेबराव विरखरे यांच्या पत्नी सौ.वंदनाताई विरखरे, माजी नगरसेवक सुनील चाफेकर यांच्या पत्नी सौ.सीमाताई चाफेकर यांच्या नावची प्रबल उमेदवार म्हणून चर्चा होत असली तरी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार कोण राहील सध्यातरी काही सांगता येणार नाही. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ. पद्माताई भुते, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सौ. किशोरीताई बसवार आदींसह माजी नगराध्यक्ष अँड. चंद्रकांत पिसे यांच्या पत्नी सौ. प्रियांकाताई पिसे, माजी नगराध्यक्षा अँड्. पल्लवीताई मुलमुले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बालपांडे यांच्या पत्नी सौ.नूतन बालपांडे, शहरातील काही प्रतिष्ठित व्यवसायी, चिकित्सक आदी उमेदवारांकडेही राजकीय पक्षांची नजर आहे.*

*तर काहि उमेदवार गुडघ्याला बाशिंग बाधुन तयार असुन त्यांना विविध पक्षांकडून त्यांना उमेदवारीच्या ऑफर मिळत असल्याच्या फोकणाड्या मारत असल्याच्या चर्चा असून,काहींना नगराध्यक्ष व नगरसेवक बनल्याचे स्वप्ने ही पडू लागले असल्याचे बोलल्या जात आहे.तर काहिंचा मनोचिकित्सकांकडे उपचार ही सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. सद्यातरी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्दव ठाकरे,शिवसेना शिंदे, स्थानिक आघाड्या, अपक्ष आदिंनी आपले उम्मेदवार घोषित केले नसुन सदरहू पक्षाच्या घोषित उमेदवारीमुळे राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.*

 

*नगर विकास आघाडीची भुमिका ही तीतकीच महत्वाची*

*सावनेर नगरपालिकेच्या राजकारणात नगर विकास आघाडीची भुमिका ही निर्णायक असणार असल्याचे जानकारांचे मत आहे*

*सावनेर नगर विकास आघाडीचे अँड् अरविंद लोधी यांनी भाजपचे सर्वेसर्वा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रस्ताव देत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह पाच प्रभागाची मागणी करत भारतीय जनता पक्षापुढे नविन पेच निर्माण केला आहे.

*सावनेर नगरपालिकेत केदार गटाला शह देण्याकरिता मागील 28 वर्षापासून भाजप व नगर विकास आघाडी युती करून सत्ता काबीज करीत आहे मागील 18 वर्षापासून सातत्याने भाजप व आघाडीची युती सत्तेत आहे. आघाडीच्या प्रस्तावात सन 1997 च्या पंचवार्षिक निवडणूकित भाजपचे संख्याबळ कमी असताना अँड. पल्लवी मुलमुले यांना समर्थन देत नगराध्यक्षपदी आरूढ करत मोठेपण दाखविले होते. तर सन 2017 च्या निवडणुकीत आघाडीने तत्कालीन नगराध्यक्ष सौ. रेखा मोवाडे यांना पाठिंबा देत नगर विकास आघाडी चे अँड् अरविंद लोधी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली निवडणूक जिंकून एकदा परत केदार समर्थक उमेदवारांना पराभूत केले होते.अश्या कुशल नेतृत्वकुशल व शहरातील मतदात्यांच्या पसंतीच्या असलेल्या आघाडीला डावलून जर भाजप निवडणुकीला पुढे जाण्याचे प्रयत्न करेल तर होऊ घातलेल्या निवडणुकीचा मार्ग भाजप करीता नक्कीच खडतर होणार.

अनेक वर्षांपासून सावनेर शहराचे राजकारण हे आघाडी व भाजप यांच्या बुद्धिबळाच्या पास्यावर चालत आले आहे, ते नेहमी सुनील केदार गटाला पालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. जर यावेळी भाजप ने आघाडीला उमेदवारी दिली तर काही दिग्गज या युतीला सावनेर पालिकेच्या सत्तेत आणण्याच्या तयारीत दिसत आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …