*नावासाठी नाही आता लढायचं गावा साठी*

सावनेर ः 2 डिसेंबर रोजी नगरपालिका सावनेर च्या सार्वत्रिक निवडणूक होणे निश्चित झाले असुन अद्यापही कोणत्याही पक्षाने आपले उम्मेदवार घोषित केले नसल्याने सद्यातरी सुमडी़ मे गुमडी़चे वातावरण निर्माण असुन कोणताही उमेदवार हे सांगण्यात आसमर्थ ठरत आहे की तो कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार*
*अश्यात क्षेत्रातील उच्चशिक्षित, उद्योगपती, प्रगशील व विकसित शेतकरी समाजसेवी लक्ष्मीकांत जोशी यांनी दंड थोफटात प्रभाग क्र.1 मधून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असुन लवकरच ते आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करणार असल्याचे सुत्र आहे.त्यांची निवडणूक लढण्याची उत्सुकता बघत त्यांना काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे तिकीट मीळाले असल्याने त्यांच्यात अजूनही उत्साह व्दिगूनीत झाल्याचे दिसून येत आहे.*
*लक्ष्मीकांत जोशी हे केमिकल इंजिनिअर असून मोठे उद्योजक व आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत प्रगशील शेतकरी म्हणून त्यांची ख्याती आहे.सोबतच दिन दुबळे,गोर गरिब तसेच गरजुंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. लक्ष्मीकांत जोशी यांची प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढविण्याची घोषणा होताच सदर प्रभागातीलच नव्हे तर संपूर्ण शहरात चर्चासत्रे सुरु झाली असुन निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे*
*सावनेर नगर पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 हा नेहमीच चर्चेचा विषय असुन सावनेर नगरपालिकेच्या राजकारणातील दमदार व्यक्तीमत्व माजी नगराध्यक्ष अँड. अरविंद लोधी ज्यांच्या विरोधात कुणीही निवडणूक लढण्यास तयार नसतो आणी लढले तर आधीच हारल्याचा निकाल समझुनच उमेदवार लढतो अश्या बलाढ्य उम्मेदवाराच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करताच होणारी निवडणूक तसेच येणाऱ्या परिणामांची उत्सुकता शिगेला पोहचत आहे*

*दोन उच्चशिक्षित आमनेसामने*
*प्रभाग क्र 1 मधे होणारी ही निवडणूक विद्देमान माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष कायदेविषयक अँड्. अरविंद लोधी विरुद्ध उच्चशिक्षित केमिकल इंजिनिअर, उद्योजक,प्रगतशील शेतकरी तसेच समाजसेवी इंजी. लक्ष्मीकांत जोशी यांच्यात होण्याची शक्यता आहे.राजकारणात असे खुप कमी बघायला मीळते जीथे दोन उचचशिक्षित आमने सामने येऊन ठाकले आहे.त्यामुळे शहरातील इतर प्रभागावर ही याचा प्रभाव निश्चितच पडणार असे जानकारांचे मत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज