Breaking News

*खापा भाजपात बंडखोरीला उधाण* *पीयुष बुरडे ला नगराध्यक्ष पदाचा उम्मेदवार घोषित करताच तिव्र नाराजीचा सुर*

*खापा भाजपात बंडखोरीला उधाण*

*पीयुष बुरडे ला नगराध्यक्ष पदाचा उम्मेदवार घोषित करताच तिव्र नाराजीचा सुर*

मुख्य संपादक- किशोर ढूँढेले

सावनेर ः तालुक्यातील खापा नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग वाजले असले तरी, राजकीय मैदान मात्र अद्यापही शांत होते. मात्र (दि. १४) शुक्रवाराला भाजप हायकमांडने एकमताने खापा नगराध्यक्षपदासाठी भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण (काटोल) पियुष बुरडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. इतर दावेदार प्रफुल मोहटे, निखिल आष्टनकर आणि खेमराज बारापात्रे यांनी बुरडे यांच्या निवडीला तीव्र विरोध केला.*

*सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप शहराध्यक्ष रवींद्र खुबाळकर, महिला अध्यक्ष शिल्पा वारोतकर यांनी आपल्या कार्यकारणीसह राजीनामा दिला. तिन्ही उमेदवार आणि नाराज कार्यकर्ते शिवसेना (शिंदे गट) व काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. नाराज उमेदवार आणि कार्यकर्ते बुरडे यांना किती पाठिंबा देतात हे पाहण्याजोगे आहे.*

*दरम्यान, स्थानिक राजकारणातील गुप्त हालचाली, आंतरकलह आणि संभाव्य बंडखोरीच्या चर्चांनी सध्या वातावरण तापले आहे. पुढील काही दिवसांत या तापलेल्या वातावरणात कडाक्याच्या थंडीत रणांगणात कोण रंगत आणणार, याकडे खापावासियांचे लक्ष लागले आहे.*

*निवड प्रक्रियेदरम्यान क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, राजीव पोद्दार, श्रीकांत देशपांडे, देविदास मदनकर, रामराव मोवाडे, सुरेंद्र शेंडे यांच्या सह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नेतेमंडळी उपस्थित होते.*
*नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अजुनही दोन दिवस शिल्लक आहे अश्यात पक्षश्रेष्ठी कोणते ठोस निर्माण घेत सुरु झालेल्या बंडखोरीला शमवतात याकडे सर्वाचे लक्ष वेघले आहे.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …