*नामांकन व छाननी प्रक्रिया पुर्ण*

*नामांकन अर्ज छाननीत दोन नगराध्यक्ष तर सात सदस्यांचे अर्ज नामंजूर*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर ः 2 डिसेंबर 2025 रोजी होऊ घातलेल्या सावनेर नगरपालिकेच्या निवडणूक च्या दि. 17 नोव्हेंबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करणे व प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी दि. 18 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम व सहाय्यक निवडणूक अधिकारी अर्शिया जुही यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यात दोन नगराध्यक्ष पद व सात नगरसेवक पदाकरीता आलेले अर्ज अर्जातील तांत्रिक अडचणी तसेच अपुऱ्या माहीतीमुळे बाद करण्यात आले*

*नगराध्यक्ष पदाकरीता आलेल्या सुनीता अरविंद लोधी, अश्विनी घाटोडे, संजना मंदार मंगळे, सीमा सुनील चाफेकर अपक्ष व काँग्रेस पक्ष असे दोन, इंदिरा अमित झोडापे,वैष्णवी आशिष मानकर,सुजाता घाटोडे व सौ घटे असे एकुण 9 अर्ज दाखल झाले होते त्यातून वैष्णवी मानकर व सुजाता घाटोडे यांचे नामांकन अर्ज नामंजूर करण्यात आले.तर नगरसेवक पदाकरीता प्राप्त एकुण 121 अर्जा पैकी प्रभाग पाच मधुन रुही बानो मो.रहमान खान, प्रभाग सात मधून सुभाष भुजाडे, प्रभाग आठ मधुन अमित झोडापे, प्रभाग नऊ मधून उज्वला सोनटक्के, प्रभाग दहा मधून छाया पाटील यांचे दोन अर्ज व पायल सुर्यवंशी असे एकुण सात नगरसेवक पदाकरीता प्राप्त अर्ज छाननीत कागदपत्रांच्या आभावी गहाळ झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम यांनी पत्र परिषदेत दीली.*

*तसेच राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेश व निवडणूक पिठासीन अधिकारी यांच्या सुचनेनुसार दोन प्रभागाच्या मतदार सुचित नाव असलेल्या 287 मतदारांपैकी 182 मतदारांशी संपर्क करुण ते मतदान करु इच्छित असलेल्या प्रभागात मतदान करण्याचे नक्की करण्यआत आले तर अन्य मतदात्यांशी संपर्क होऊ शकला नाही*
Maharashtra News Media सच की आवाज