*मतदान जन-जागृती करीता भव्य बाईक रैली*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर – नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणुका 2025,
मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत. निवडणुकी मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्शिया जुही यांच्या मार्गदर्शनाखाली,रवींद्र लोही SVEEP नोडल अधिकारी,संदेश खंडागळे, बालाजी बेंबडे, रोशन धोटे , विनय वाघमारे , शिवदास ठाकरे,मयूर चाफेकर या कर्मचाऱ्यांच्या साह्याने माननीय मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद सावनेर येथुन मतदान जनजागृती करण्यासाठी भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले .

रॅली मध्ये सावनेर शहरातील समस्त शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला . ज्यामध्ये नगरपरिषद सावनेर, तहसील सावनेर,पंचायत समिती सावनेर ,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर , महावितरण संस्था सावनेर, सार्वजनिक बांधकाम विभाग सावनेर, सावनेर नगरपरिषदेच्या शाळेमधील शिक्षक, यांनी विविध पोस्टर च्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून मतदाना संबंधित जागरूकता निर्माण करण्यात आली .रॅलीचा उद्देश समाजामध्ये मतदानासंबंधीचे जनजागृती करून लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे हा होता.
Maharashtra News Media सच की आवाज