Breaking News

*निवडणूक निरिक्षकांनी घेतला निवडणूक प्रक्रियेचा आढावा*

*निवडणूक निरिक्षकांनी घेतला निवडणूक प्रक्रियेचा आढावा*

मुख्य संपादक- किशोर ढूँढेले
सावनेर ः नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणूक 2025 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री संतोष थिटे अप्पर जिल्हाधिकारी , चिमूर. यांनी नगरपरिषद सावनेर येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षेत निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या सावनेर नगर परिषदेच्या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून श्री संतोष थिटे अप्पर जिल्हाधिकारी, चिमूर यांची निवडणूक निरीक्षक ( ऑब्झर्वर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नगरपरिषद सावनेर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्री अक्षय पोयाम ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्शिया जुही आणि संबंधित इतर सर्व अधिकारी यांची बैठक घेऊन होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अध्यक्ष व नगरसेवकांसाठी आलेल्या उमेदवार नामनिर्देशन पत्राची माहिती घेतली, तसेच उमेदवार छाननी प्रक्रियेची माहिती घेतली, त्याचबरोबर स्ट्रॉंग रूम ची पाहणी करून, ईव्हीएम मशीन , बायलोट युनिट, कंट्रोल युनिट, सर्व मतदान केंद्र, विविध प्रक्रिया विषयी माहिती घेऊन नोडल अधिकारी , झोनल अधिकारी, मतदान कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रिया विषयी मार्गदर्शन केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …