*कर्मचाऱ्यांचे मतदान प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न*

*सावनेर ः नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्शिया जुही यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान पथक यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्शिया जुही यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्याकरिता एकूण 11 प्रभागांकरिता 39 मतदान केंद्रांकरिता 48 पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 192 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये नायब तहसीलदार कैलास आल्लेवार, नायब तहसीलदार प्रशांत गोविंदवार , त्याचबरोबर नगरपरिषद सावनेरचे कर्मचारी, सावनेर तहसीलचे कर्मचारी, सावनेर पंचायत समितीचे कर्मचारी आदी. उपस्थित होते.

सदर प्रशिक्षणात सावनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्शीया जुही यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना तंत्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करत मतदानाच्या वेळी उदभवणार्या प्रत्येक छोट्या मोठ्या तांत्रिक अडचणी कश्या सोडवाव्यात यावर सखोल मार्गदर्शन करत होऊ घातलेल्या निवडणुकी पारदर्शक व निष्पक्ष संपन्न व्हाव्यात याकरिता पुर्णपणे प्रयत्न करत आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज