*भाजपने घेतली प्रचारात आघाडी*
*आमदार डॉ.आशिष देशमुख आणि जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचे मतदानाचे आवाहन*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेर: नगरपालिका निवडणुका जवळ येताच, सर्व पक्ष त्यांचे प्रचार प्रसार वाढवत आहेत. सावनेर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या उमेदवारांना बहुमत मिळवून देण्यासाठी जोरदार जमीनी प्रचार करत आहे. एकीकडे,गावची सुन म्हणून तरुण, उच्चशिक्षित भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंदार मंगळे या सकाळपासूनच त्यांच्या सहकारी नगरपालिका नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार करत मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत सोबतच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत.
मतदार त्यांना आशीर्वाद देऊन विजयी होताना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे एकत्रीत चित्र सध्यास्थीतीत दिसून येत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत एकच धेय्य प्रचार प्रचार प्रचार ना थकवा ना विश्रांती फक्त एकच ध्येय: शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे. नगरपालिका निवडणुकीत लढणारे सर्व उमेदवार त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, ज्येष्ठ नेते रामराव मोवडे आणि इतर नेतेही प्रचारात सक्रिय सहभागी होत आहेत. याशिवाय, भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख संपूर्ण सावनेर शहरात प्रचार करत अध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंदार मांगले आणि त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांना प्रोत्साहन देत आहेत. सध्याच्या निवडणूक प्रचाराकडे पाहता, भारतीय जनता पक्ष प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज