Breaking News

*पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विनोद लेनगुरे विजयी*

*पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विनोद लेनगुरे विजयी*

गढ़चिरोली प्रतिनिधि सूरज कुकुड़कर

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद क्षेत्राच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विनोद लेनगुरे यांनी ९५ मतांनी विजय मिळवत काँग्रेसची जागा कायम राखली. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार नलेश्वर कावळे यांचा पराभव केला.

पेंढरी-गट्टा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य श्रीनिवास दुलमवार यांचे सदस्यत्व् जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने रद्द झाले होते. त्यामुळे तेथे १२ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यात चार उमेदवार रिंगणात होते. आज धानोरा येथील तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे विनोद लेनगुरे विजयी झाले. त्यांना २२२६ मते मिळाली. भाजपचे नलेश्वर कावळे यांना २१३१, शिवसेनेचे सुनील पोरेड्डीवार यांना १०३०, तर अपक्ष उमेदवार प्रज्वल नागुलवार यांना ८५८ मते मिळाली. ३५० मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली.

विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, ललीत बरछा, तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मनोहर पोरेटी, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुलमवार, केसरी उसेंडी, शांताबाई परसे, छबीलाल बेसरा, जमीर कुरेशी, बशीर पिराणी, ईश्वर खोब्रागडे, सुखदेव टेकाम, कुलदीप इंदूरकर, प्रशांत कोराम, चंदू किरंगे, लालाजी परसे, मुबारक सय्यद, सदाशिव येरमे, विनोद मडावी, कल्पना वड्डे, जास्वंदा करंगामी, शेवंता हलामी, नरेश भैसारे, मिलिंद किरंगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …