Breaking News

*काँग्रेस आणि शिवसेना उबाठा ने भव्य रॅली काढत केले शक्तीप्रदर्शन* *माजी आमदार सुनील केदार, उत्तम कापसे शिवसेना जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला*

*काँग्रेस आणि शिवसेना उबाठा ने भव्य रॅली काढत केले शक्तीप्रदर्शन*

*माजी आमदार सुनील केदार, उत्तम कापसे शिवसेना जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीने उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला*

मुख्य संपादक- किशोर ढूँढेले

सावनेर: २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपला प्रचारात गती आणत आहेत आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून जनसंपर्क वाढवत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना उबाठ उम्मेदवार प्रचारात वर्चस्व मिळवताना दिसत आहे.*

*२८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता राजकमल चौकातील काँग्रेस-शिवसेना प्रचार कार्यालयापासून प्रभाग क्रमांक १ मध्ये जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे आणि काँग्रेस नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा सुनील चाफेकर यांची प्रभाग क्र. १ चे उमेदवार लक्ष्मीकांत जोशी, ममता नारनवरे, मनोज बसवार इत्यादींच्या उपस्थितीत शहरातील प्रभाग १ आणि प्रभाग २ मध्ये भव्य रॅली काढण्यात आली आणि जनसंपर्क करण्यात आला आणि मतदारांकडून आशीर्वाद मागत मागील पंधरा वर्षापासून भकास झालेल्या सावनेर नगरीला सुजलाम सुफलाम करण्याकरिता काँग्रेस उबाठा आघाडीच्या उम्मेदवारांना मतदान करण्याचे आव्हान करण्यात आले.*


*या भव्य रॅलीमध्ये “जोर जुलम की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है” या घोषणेसह समर्थकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे; स्थानिक आमदारांच्या नगर परिषद निवडणुकीदरम्यान मंचावरून “उभा फाडून टाकू, कापून टाकू” अश्या विधानांच्या प्रती मतदारसंघात संघात तीव्र नारजी चे स्वर दिसून ये आहे तर भाजपचे फायरब्रँड अँबेसेडर, महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानांमुळे मतदारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेस शिवसेना युतीचे उमेदवार करत आहेत.


*या भव्य रॅलीत या क्षेत्रातील माजी आमदार सुनील केदार, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांनी सहभाग घेतला आणि उमेदवारांचा उत्साह वाढवल्याचे दिसून येत आहे. तर प्रभाग 1 चे वयोवृद्ध उम्मेदवार लक्ष्मीकांत जोशी हे मागील तीस वर्षापासून प्राभातून एकच परिवारातील सदस्य निवडणूक येत असल्याने तेथील विकास कुंठीत झाल्याचा आरोप करत जनतेने आम्हाला साथ दीली तर पुढील पाच वर्षोत शहरातील सर्वात विकसित प्रभाग ज्यात वयोवृद्ध लोंकानकरिता बाग बगीचे, छोट्या मुलांकरीरा बाललोद्यान,युवकांना रोजगाराच्या संधी उपल्ब्ध करुण देण्यासाठी प्रशिक्षण शिबीरे आयोजित करणे, प्रभागातील उघड्या नाल्या रस्त्यावर वाहणारे गटाराचे घाणपाणी,पथदिवे, रस्ते चकाचक करण्याचा संकल्प घेऊन मैदान लढत असल्याचे बोलुन दाखवले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …