*सावनेरात त्रिकोणी लढत*
*काँग्रेस, भाजप व नगरविकास आघाडीत वाढती चुरस*
सावनेर ः 2 डिसेंबर 2025 रोजी होऊ घातलेल्या नगर पालीका निवडणुकीत आता सर्वच पक्ष आपल्या उम्मेदवारांचा प्रचारात घाम गाळत असुन ठीकठीकाणी सभा व बैठकीच्या आयोजनावर भर दिल्या जात आहे.सोबतच सर्व पक्ष आपल्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवत आहेत. तर आजी माजी आमदार खासदार ही गल्लोगल्ली फेरफटका मारत विकासाच्या नावावर मतदारांना मते मागत आहे.ऐवढेच नव्हे राज्याचे राजस्वमंत्री, जिल्ह्याचे पालक मंत्री आमचाच उमेदवारांना निवडून द्या अन्यथा निधी मिळणार नाही चा राग आलापत आहे तर क्षेत्राचे आमदार चक्क “फडकवून टाकीन तुले अर्धा” ही फडणवीस साहेबांची सरकार आहे म्हणत मते मागत आहे.त्यामुळे राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष देशमुख यांच्या या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाला फयदा होतो की तोटा हे येत्या 3 डिसेंबर ला निवडणुकीच्या निकालातून नक्कीच दिसून येणार.*

*तर काँग्रेस, शिवसेना उबाठा,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महायुती पक्षातर्फे माजी आमदार सुनील केदार, खासदार बर्वे, शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल, युवा मनोज बसवार, राजेश खंगारे, शफीक सैय्यद, शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळून प्रचारात वेग आणला आहे.तर नगर विकास आघाडी चे प्रणेते अँड् अरविंद लोधी, अँड्. चंद्रशेखर बरेठीयाँ व त्यांचे सहयोगी गनिमी काव्याने आपला जमिनी प्रचार करत मैदान गाजवत आहे.अश्यात होऊ घातलेली नगरपालिका निवडणूक ही सध्यातरी तीरंगी लढत दिसून येत आहे.तर या तीरंगी लढतीची भिस्त ही अपक्ष उम्मेदवार इंदिरा अमित झोडापे यांना मिळणाऱ्या मतांच्या भरोश्यावरच अवलंबून असणार असे जानकारांचे मत आहे.तर निवडणुकीत इतर पक्षांची भुमिका “पाणी कम चाय” सारखी असल्याचे चित्र दिसून येत आहे*

*सध्यास्थीतीत भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार संजना मंदार मंगळे, काँग्रेस युतीच्या सीमा सुनील चाफेकर, नगरविकास आघाडीच्या सुनिता अरविंद लोधी यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूकीची लढत तिरंगी दिसत असली तरी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उम्मेदवार इंदिरा झोडापे यांच्या उपस्थितीमुळे गरिब,मध्यमवर्गीय तसे हवा पाहुन तीवा मांडणार्या मतदात्यांचा कौल त्यांच्या बाजुने वळल्यास भारतीय जनता पक्ष, काँग्रेस शिवसेना आधाडी, तसेच नगर विकास आघाडी यांच्या उमेदवारांना अडचणीत आणू शकते.*

*भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व नगरविकास आघाडी आपआपल्या उमेदवारांच्या प्रचारात पुढाकार घेत विजय विजय आपलाच गुलाल म्हणत असले तरी नगरीतील मतदाते कोणत्या पक्षाला आपला मत रुपी आशीर्वाद देऊन नगरपालिकेची सत्ता सोपवतात हे सद्यातरी सांगने कठीण आहे*
Maharashtra News Media सच की आवाज