Breaking News

*मैदान गाजवत आहे वयोवृद्ध उम्मेदवार*

*मैदान गाजवत आहे वयोवृद्ध उम्मेदवार*

 

सावनेर ः 2 डिसेंबर 2025 ला होऊ घातलेली नगर पालीका सावनेर ची निवडणूक आनेक विषयांवर चर्चेची ठरत असतांनाच प्रभाग क्र.1 मधून निवडणूक लढत असलले वयोवृद्ध लक्ष्मीकांत जोशी यांनी सर्व नगरवासींयांचे लक्ष वेधत असुन प्रतीव्दंदी उमेदवारांना कडवी झुंज देत आहेत*


*शहरातील प्रभाग क्र. 1 मधिल दोन वार्डात मागील अनेक वर्षापासून एकाच परिवारातील सदस्य निवडूण येत असून ज्या प्रभागातील मतदात्यांनी त्यांना आपले अमुल्य मते देत नगरसेवक ते नगराध्यक्ष पदापर्यंत पोहचवीले तरीही त्या प्रभागातील जनसमस्या सोडविण्यात ते अपयशी ठरुण सुद्धा ही परत परत निवडणुकी लढतात जींकतात व प्रभागातील मतदात्यांना वारेवर सोडून माल दाबण्यात व्यस्त होऊन जातात अश्या दबंग उम्मेदवाराच्या विरोधात शहरातील कुणीही पुर्ण क्षमते निवडणूक लढण्याची कुणी हिम्मत करत नाही. सोबत सदर प्रभागातील एक प्रभाग दलित वस्ती असुन या प्रभागाकडे मागील नगरसेवकांनी लक्ष न दिल्याने सदर प्रभागात ना धड रस्ते,ना पथदिवे,उघड्या नाल्या, चहुबाजूंनी घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र आहे. सदर प्रभागातील जनसमस्यां बघत प्रभागातील व शहरातील जनतेची निस्वार्थी सेवा करण्याचा धेय्य उराशी घेत होऊ घातलेल्या नगर पालीका निवडणुकीत शहरातील 72 वर्षीय उच्चशिक्षित केमिकल इंजीनियर लक्ष्मीकांत जोशी उपाख्य काका प्रभागातील ममता नारनवरे या उच्चशिक्षित तरुणी ची साथ घेत निवडणुकीचे मैदानात गाजवत आहेत.युवा तडफदार उच्चशिक्षित ममताताई नारनवरे यांची उर्जा व जोशी काका यांचा अनुभव नक्कीच आमच्या प्रभागाच्या समस्या सोडवून समग्र विकास करतील असा विश्वास प्रभागातील मतदाते बोलून दाखवत आहेत. त्यामुळे विरोधकांची घाबरगुंडी उडाली असल्याचे एकत्र चित्र आहे.*

*काका तुम्ही बसा आम्ही प्रचार करतो*

*वयोवृद्ध असलेले लक्ष्मीकांत जोशी काका सकाळपासूनच आपल्या मतदार प्रभागात पोहचुन मतदात्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत तर सुशिक्षित अशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार विषयक मार्गदर्शन करुण रोजगाराच्या संधी कश्या उपलब्ध होतील यावर युवक युवतींचे धाडस बांधत असल्याने त्यांना जनतेचे भरगोस असे प्रेम मिळत असुन त्यांच्या साथीला असलेल्या तडफदार तरुणी ममता नारनवरे आश्या या उम्मेदवारांची जोडीच आमच्या क्षेत्राचा विकास करेल अश्या आशा प्रभागातील मतदात्यांमधे पुलकित होऊ लागल्या असुन. जोशी काका प्रचाराला आले की प्रभागातील मतदाते म्हणतात काका तुम्ही तीथेच थांबा आम्हीच तुमच्या जवळ येतो असे म्हणत काका जवळ एकच घोळका करत आहे.त्यामुळे काँग्रेस शिवसेना युतीच्या या दोन्ही उम्मेदवारांसोबतच नगराध्यक्ष पदाच्या सीमा सुनील चाफेकर यांना ही भरपूर फायदा होत असल्याचे दिसून येत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …