Breaking News

*मतपेट्या खोलीची सुरक्षा सीआरपीएफकडे सोपवा* *काँग्रेस पक्षाची मागणी* *पारदर्शक मतमोजणीबाबत शंका*

*मतपेट्या खोलीची सुरक्षा सीआरपीएफकडे सोपवा*

*काँग्रेस पक्षाची मागणी*

*पारदर्शक मतमोजणीबाबत शंका*

सावनेर: सावनेर नगरपालिका निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडेले व मतमोजणी ३ डिसेंबर रोजी पूर्ण होणार होती, परंतु मतदान सुरु असतांनाच माशी शींकली व मतदानाच्या दिवशी उच्च न्यायालयाने ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी पुढे ढकलली आणि ती २१ डिसेंबर रोजी घेण्याचे आदेश दिले. या आदेशाचे संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये असंतोष आणि अविश्वास व्यक्त केला आहे आणि राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावरील अविश्वास वाढत असुन या अठरा दिवसात राज्य शासनकर्ते काहीतरी मोठे घालमेल करतील ज्याचे निवडणुकीचे परिणामावर पडेल अश्या जनचर्चेला उधाण आले आहे.*

*मतदान पूर्ण झाल्यानंतर, मतपेट्या (ईव्हीएम मशीन) नगरपालिका इमारतीतील एका स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या. तथापि, मतदानस्थळी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप करत, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सीमा चाफेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष पवन जैस्वाल, मनोज बसवार, माजी पंचायत समिती सावनेर सभापती गोविंदा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी सावनेर नगरपालिका निवडणूक नीर्णय अधिकारी अक्षय पोयाम यांना लेखी निवेदन सादर केले, ज्यामध्ये स्ट्राँग रूम आणि परिसरात सीआरपीएफ सुरक्षा वाढवावी कॅमेरे बसवावेत आणि संपूर्ण फुटेज नगरपालिका कार्यालयाबाहेरील मोठ्या एलसीडी टीव्ही स्क्रीनवर प्रदर्शित करावेत अशी विनंती केली होती. नगरपरिषद निवडणुकीत भाग घेणाऱ्या सर्व उमेदवारांच्या मोबाईल फोनवरही हीच सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होण्यापूर्वी, मतमोजणी क्षेत्रात जॅमर बसवावेत आणि मतमोजणीदरम्यान ईव्हीएम मशीन उघडताना कोणत्याही उपकरणाशी छेडछाड होणार नाही याची खात्री करावी आणि महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेल्या खाजगी सुरक्षा एजन्सीद्वारे स्ट्राँग रूमच्या बाहेर २४ तास १०-१२ सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांची पाळी पाळीने नियुक्ती करावी. स्ट्राँग रूमची सुरक्षा आणि पारदर्शक मतमोजणी याबाबत शंका व्यक्त करण्यात आली आहे.*

*यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ममता नरनावरे, लक्ष्मीकांत जोशी, मालती कुहिते, शुभम देवलकर, अर्चना सातपुते, रमेश घाटे, सुषमा वालबुधे, मोरेश्वर बर्डे, लता इंगेवार, सुनील चाफेकर, मनीषा नाईक, अमोल आकुलवार, हेमंत, गज्जू, दीपिका, सुनील, दीपिका, सुनील चाफेकर. वानखेडे, अर्चना बगाडे, वासुदेव मेंहाडोळे, सोनम पन्नमी, अरुण कळंबा, दीपाली राऊत, रेखा गजबे, सौरभ साबळे यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती गोविंदा ठाकरे,राजेंद्र ( बालु) नरनावरे, दीपक बसवार, मनोज कुहिते, चंदू कामदार, श्रीजय देशमुख, अश्विन कारोकार, युवराज बागडे आदी उपस्थित होते.*

*अश्याच प्रकारचे निवेदन दि. 5 डिसेंबर रोजी नगरविकास आघाडी चे प्रणेते अँड्. अरविंद लोधी, नगरविकास आघाडीच्या अध्यक्ष पदाच्या उम्मेदवार सुनिता लोधी व त्यांचे सहयोगी उम्मेदवारांनी सुद्धा दीले असुन त्यांनीही मतपेट्यांच्या सुरक्षितता व पारदर्शक मतमोजणी यावर संशय व्यक्त केला होता हीच स्थिती संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली असुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे वारंवार सोशल मिडीयावर आम्हीच निवडून येणार,”गुलाल आमचाच” असे वक्तव्य देत परिणामानंतर विरोधक ईव्हीएम ईव्हीएम बोंम्बलतील अश्या प्रतिक्रिया देत असल्याने खरेच मतमोजणी पारदर्शक होऊन योग्य परिणाम लागतीलच याची मात्र खात्री कमच दिसून येत आहे.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …