Breaking News

जीर्ण पुलाच्या प्रश्नावर युवकाचे अनोखे आंदोलन! घाण पाण्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध! वृद्ध महिला पडली, कार पडली… पुढचा नंबर कुणाचा? ब्रिटिशकालीन पुलावर मृत्यूचा सापळा!

जीर्ण पुलाच्या प्रश्नावर युवकाचे अनोखे आंदोलन!

घाण पाण्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध!

वृद्ध महिला पडली, कार पडली… पुढचा नंबर कुणाचा?
ब्रिटिशकालीन पुलावर मृत्यूचा सापळा!

सावनेर- केळवद येथील जीर्ण आणि अत्यंत धोकादायक झालेल्या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने प्रशासनाची गंभीर बेपरवाई पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पुलाच्या दोन्ही बाजू पूर्णपणे खुल्या असून, तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेट लावण्यासही प्रशासनाने नकार दिला आहे. “फालतू पैसा कशाला खर्च करायचा?” असे अमानवी उत्तर प्रशासनाकडून दिले जात असल्याचा आरोप स्थानिक युवक अक्षय भुजाडे करीत आहे.


या पुलामुळे नागरिकांचा जीव सतत धोक्यात आहे. मागील आठवड्यात याच पुलावरून एक वृद्ध महिला खाली पडल्या होत्या. सुदैवाने त्यांचा जीव वाचला, मात्र गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. परिणामी कालच एक कार थेट पुलावरून खाली कोसळली. हा अपघात मोठ्या जीवितहानीत बदलू शकला असता, मात्र प्रशासन अजूनही निष्क्रिय आहे.


या परिस्थितीविरोधात संतप्त अक्षय भुजाडे या युवकाने आज पुलाखाली साचलेल्या घाण, दुर्गंधीयुक्त पाण्यात उतरून अनोखे व तीव्र आंदोलन सुरू केले आहे. “निधी मंजूर असूनही पूल बांधला जात नाही, आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी साधे बॅरिकेट लावायलाही प्रशासन तयार नाही. जर माणसाच्या जीवाची किंमत शून्य असेल, तर घाण पाण्यात उतरून प्रशासनाला जागे करू,” असा थेट इशारा या युवकाने दिला आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, “कार पडली, आजी पडली… पुढचा नंबर कुणाचा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. एखादा बळी गेल्यानंतरच काम सुरू होणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहे.
प्रशासनाच्या या संवेदनशून्य आणि जबाबदारीहीन भूमिकेमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर पुलावर तात्काळ बॅरिकेट लावले नाहीत व पुलाचे नविन बांधकाम सुरू केले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलक अक्षय भुजाडे, आप चे शहरप्रमुख मोरेश्वर वाघमारे व नागरिकांनी दिला आहे.


दि.28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुरु झालेले आंदोलनाची सायंकाळी 7-00 वाजेपर्यंत प्रशासनाने दखल न घेतल्याने शेकडो महिला पुरुष, युवक युवतीने आंदोलन स्थीळी धाव घेत आपले सहकार्य नोंदवत गावाकरिता आंदोलनात्मक भुमिका घेणारे अक्षय भुजाडे यांना पाठिंबा देत अक्षय भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है चा जयघोष करत उत्साहवर्धन केले तर कडाक्याच्या थंडीत दिवसभर घाणपाण्याच्या नाल्यात उभे राहुन आक्षय भुजाडे व मोरेश्वर वाघमारे गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत आहेत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …