*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी*
सावनेर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे, माजी नगरसेवक तुषार उर्फ बंटी उमाटे,नवनिर्वाचित नगरसेवक राजु घुगल व नवनिर्वाचित नगरसेविका सोनाली उमाटे, कोकिळा जाधव, अश्विनी संय्याम ,चित्रा वाट,नलीनी नारेकर, आशिष मानकर, महेश चकोले, प्रशांत. घोळसे, दिवाकर नारेकर, पिंटू सातपुते, शालिक मोहतुरे, अरुणा मोहतुरे, पिंकी वाट, अश्विनी घोळसे, सुशीला उमाटे, संगीता धांडोळे, रंजना गायधने, अमोल जाधव, अभिषेक सातपुते, प्रज्वल कांबळे, सागर मोहतुरे, धीरज अलोणे, दिगंबर चाफेकर, प्रदीप गायधने, बंटी सातपुते इत्यादींच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात असलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. संजना मंदार मंगळे यांनी आपले विचार व्यक्त करत म्हठले की, जर समाजाच्या तीव्र विरोधाला न जुमानता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची व्यवस्था केली नसती तर आजही देशातील महिला घरकाम करताना दिसल्या असत्या. महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत. मी स्वतः याचे उदाहरण आहे. जर सावित्रीबाई फुले नसत्या तर माझ्यासारखी महिला कधीही नगरीच्या नगराध्यक्षा पदावर निवड झाली नसती. असे विचार व्यक्त केले.तर नवनियुक्त नगरसेविका सोनाली उमाटे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, आज येथे उभी आहे ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देन आहे. आपल्या संस्कृतीत महिलांना देवी म्हणून पूजले जाते. पण त्यांना शिक्षित करण्याचे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि त्यांना हक्क देण्याचे महान कार्य हे क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांनी विपरीत परिस्थितीत केलेल्या कार्याचे प्रतिफळ आहे. असे विचार व्यक्त करून त्यांना मानपुर्वक आदरांजली वाहिली.*
Maharashtra News Media सच की आवाज