Breaking News

वंचित बहुजन आघाडी सामान्य जनतेच्या हितासाठी लढा देणार:राजू झोडे

 

वंचित बहुजन आघाडी सामान्य जनतेच्या हितासाठी लढा देणार:राजू झोडे

गढ़चिरोली प्रतिनिधि सूरज कुकुडकर

गडचिरोली: प्रस्थापित पक्षांना सत्ता इतकी प्रिय झाली आहे की, ते सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत. देशात व राज्यात असे चित्र बघायला मिळत आहे. या प्रस्थापितांना सर्वसामान्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. परंतु वंचित बहुजन आघाडी सामान्य जनतेच्या हितासाठी लढा देत राहील, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रभारी राजू झोडे यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा समीक्षा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या विदर्भ समितीचे नेते अरविंद सांदेकर, डॉ. राकेश गावतूरे, भारिप बहुजन महासंघाचे (दक्षिण) जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.हंसराज बडोले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन कुकुडकर, महिला नेत्या माला भजगवळी, जिल्हा उपाध्यक्ष नरेश महाडोळे, जी.के.बारसिंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

राजू झोडे पुढे म्हणाले, देश व राज्यातील सर्व प्रमुख पक्ष हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यामूळे सध्या देशात व राज्यात विरोधी पक्ष ही संकल्पना नावापुरतीच शिल्लक आहे, केंद्राने घेतलेल्या नागरिकत्वाच्या भूमिकेचा विरोध करायला कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कां पुढे येत नाही, असा सवाल उपस्थित करून झोडे यांनी संविधान विरोधकांचे मनसुबे अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.

सभेचे प्रस्ताविक व संचालन बाळू टेंभुर्णे यांनी केले. नरेश महाडोळे यांनी आभार मानले. सभेला जिल्हा महासचिव डाकराम वाघमारे, वंचितचे जिल्हा सचिव योगेंद्र बांगरे, सीताराम टेंभुर्णे, राजेंद्र बांबोळे, युवा नेते गुलाब मुगल, डॉ योगेश नंदेश्वर, विनोद कोडाप, नामदेव मेश्राम, मनोज घायवान, मंगलदास चापले, तुफान उंदिरवाडे, ज्योती दहिकर, सुनंदा देवतळे, मंजुषा थेरकर, मंदा तुरे, नितीन भैसारे, राजू पेंदाम, डोंगरे पेंटर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …