बौद्धांच्या कायद्यासाठी शरद पवार यांना समाज क्रांती आघाडी चे साकडे
आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २४६ अन्वये देशातील इतर धर्माप्रमाणे बौद्ध धर्माचा स्वतंत्र कायदा तयार व्हावा आणि महाबोधी महाविहाराचे संपुर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या स्वाधीन करावे या व इतर महत्वाच्या मागण्याचे निवेदन एका शिष्टमंडळाद्वारे समाज क्रांती आघाडी चे अध्यक्ष अॅड. मुकुंद खैरे यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांना देवगीरी बंगल्यावर देण्यात आले. तसेच ११ फेब्रुवारी २०२० रोजी समाज क्रांती आघाडी तर्फे जंतर-मंतर वर धडकणाऱ्या महामोर्चात शरद पवारांनी भेट द्यावी, याबाबत सुद्धा त्यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती अॅड.शताब्दी खैरे यांनी दिली.
बौद्धांच्या कायद्याबरोबर राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७ नुसार भुमिहिनांना जमिनीचा हक्क, अनुच्छेद ४१ नुसार बेरोजगारांना रोजगाराचा हक्क, अनुच्छेद २१ नुसार बेघर लोकांना घरांच्या हक्का बाबत सुद्धा समाज क्रांती आघाडी मागणी केली आहे. या प्रसंगी शिष्टमंडळामधे जिल्ह्यातील आघाडीचे कार्यकर्ते सर्वश्री सागर बोरकर, रुषीभाऊ वाघमारे, रविकुमार वाघमारे, भाऊराव देठे, गणपत पुणेकर, मारोतराव लोखंडे, सुभाष ताकसांडे इत्यादिंची उपस्थिती होती.
Maharashtra News Media सच की आवाज