*केदार ग्रामीणमधे आज ही असरदार*
*पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही सरपंच व 7 ग्रामपंचायत सदस्य विजयी*
*ग्रामपंचायतींच्या निकालातून पंचायत समिती जिल्हापरिषदेचे राजकीय समीकरणे बदलणार…?*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ः दि.28 एप्रिल ला सावनेर तालुक्यातील केळवद हत्तीसरा या ग्रामपंचायत च्या सरपंच व कोच्छी,टा.भनसाळी, तिघई, मा.टाऊन,जोगा,रायवाडी,परसोडी, वलनी येथील ग्रामपंचायत सदस्यांकरीता मतदान झाले व दि.29 एप्रिल ला पार पडलेल्या मतमोजणीत पुर्व मंत्री सुनील केदार समर्थीत उम्मेदवारांनी विजय मिळवत.क्षेत्राचे सोशल मिडियावर एँक्टीव आमदार डॉ. आशिष देशमुख यांना पुर्व मंत्री सुनिल केदार यांचे ग्रामीण भागातील वर्चस्व दाखवून दिले असून भाजपचे आमदार आशिष देशमुख यांना आत्मपरीक्षणाचा संदेश मिळाल्याचे मानले जात आहे.*

*सावनेर तालुक्यातील केळवद आणि हत्तीसरा येथील ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी (ता.२९) जाहीर झाला. यामध्ये माजी मंत्री सुनिल केदार गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या गटाला या स्थानिक निवडणुकीत चांगलाच धक्का बसला आहे. या निकालामुळे सुनिल केदार यांचे ग्रामीण भागातील वर्चस्व आजही कायम असल्याचे ग्रामस्थांनी दाखवू देत ट्रीपल इंजन सरकार च्या उम्मेदवारांना नाकारले आहे.*

*केळवद ग्रामपंचायत*
*तालुक्यातील महत्वपुर्ण मानल्या जाणाऱ्या केळवद ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत केदार गट समर्थित उमेदवार कैलास गांधी यांनी भाजप समर्थित उमेदवार सचिन ढोबळे यांचा ३५३ मतांनी पराभव केला. कैलास गांधी यांना १९६८ मते मिळाली, तर सचिन ढोबळे यांना १६१५ मते मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रकाश ढोबळे यांना २११ मते, तर अपक्ष उमेदवार चंद्रमणी निकोसे यांना ७७ मते मिळाली. तर हत्तीसर ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत केदार गटाचे अनिल गुडधे यांनी ४७२ मते मिळवत भाजप समर्थित निलेश भाकरे यांचा अवघ्या चार मतांनी पराभव केला. निलेश भाकरे यांना ४६८ मते मिळाली, तर आम आदमी पक्ष समर्थित सुरज गुडधे यांना ४० मते मिळाली.*

*सदस्यपदासाठी हे विजयी*
*सिल्लेवाडा ग्रामपंचायत प्रभाग दोनमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून राजेश ढोरे ३३६ मते मिळवत विजयी झाले. त्यांनी राजू शिंदे यांचा पराभव केला. वलनी ग्रामपंचायत प्रभाग पाचमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून जुलेखा अन्सारी यांनी १४७ मते मिळवत कौसल्या केसरकर यांचा सहा मतांनी पराभव केला. प्रभाग सहामध्ये गौतम संजू १५४ मते मिळवत विजयी झाले.वलनी येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या पोट निवडणुकीत केदार गटाचे स्थानिक कार्यकर्ते प्रकाश खापरे व लईक अंन्सारी यांच्या उम्मेदवारांत झालेल्या चुरशीच्या लढतीत केदार गटाचे अंन्सारी यांचे दोन्हीही सदस्य निवडूण आले तर काँग्रेस पक्ष समर्थीत कोच्छी, टाकळी भन्साळी, तीघई, माळेगांव टाऊन, जोगा, रायवाडी , परसोडी येथे केदार गटाचे ग्रामपंचायत सदस्य निर्वीरोध निवडून आले.*

*केदार गटाने केळवद व हत्तीसरा येथील सरपंच पदाचे उम्मेदवारांना निवडून आणत कधी काळी सुनील केदार यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी नागपुर जिल्हापरिषद उपाध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे नागपुर जिल्हा अध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या पत्नीच्या जिल्हापरिषद क्षेत्रातच त्यांना क्लीन बोल्ड केल्याने पुढे होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हापरिषद निवडणुकीपुर्वीच घाम फोडल्याचे बोलल्या जात असुन जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हापरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत केदार गटाने ग्रामीण भागातील आपली ताकत दाखवून दीली असल्याचे चीत्र आहे*
Maharashtra News Media सच की आवाज