*सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला चालना द्या- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश*

*सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्पाला चालना द्या- मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश*

विशेष प्रतिनिधि-सूरज कुकडकर

 

नागपूर,: गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील रेल्वे सुविधा, अन्य दळणवळण, वीजपुरवठा यासारख्या विकास कामांना चालना मिळून नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल, त्यामुळे या प्रकल्पास चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. या बैठकीस उपस्थित असलेल्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या मुद्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातील जिल्हानिहाय बैठका घेऊन श्री. ठाकरे हे आढावा घेत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचा आज आढावा घेण्यात आला. या बैठकीस राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, रामदास आंबटकर, कृष्णा गजबे तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव यांचीही उपस्थिती होती.

या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील पदभरती, दूरसंचार समस्या, शेतीविषयक समस्या, धान खरेदी याबाबतचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही समस्या असल्यास हक्काने माझ्याकडे या. धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याआधीच भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

लगतच्या तेलंगाना राज्यातील कालेश्वर येथे होत असलेल्या मेडीगड्डा बॅरेजच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही क्षेत्र बुडीत झाल्याने स्थानिक आदिवासींचे नुकसान झाले आहे. मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचीही एका समितीमार्फत तपासणी करुन राज्याच्या हद्दीत झालेल्या परिणामांची पाहणी करावी. ही माहिती एकत्र करुन अहवाल तयार करावा,अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

*विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचना*

या आढावा बैठकीस विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हेही आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सूरजागड लोह उत्खनन प्रकल्प, धान खरेदी, मेडीगड्डा बॅरेज याविषयावर शासनाला सूचना केल्या. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कामांबाबत सद्यस्थिती बैठकीत सांगितली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …