Breaking News

*उदयमान खेडाळूचे साँफ्टबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चयन* – *चयनीत सौरभ जवाहरलाल नेहरू हायस्कूल चा विद्यार्थी*

*उदयमान खेडाळूचे साँफ्टबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चयन*

*चयनीत सौरभ जवाहरलाल नेहरू हायस्कूल चा विद्यार्थी*

सावनेर प्रतिनिधि सुुरज सेलकर

*सावनेर महाराष्ट्र राज्य क्रीडा व सेवा संचालणालय पुणे व भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा संयुक्त विध्यमानाने आयोजित राज्य स्तरीय शालेय साँफ्टबॉल क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत जवाहरलाल नेहरू हायस्कूल सावनेर च्या सौरभ दीपक वानखेडे याची महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली*

*छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या पटांगणात १४ वर्षीय मुल व मुली यांचा स्पर्धा संपन्न झाल्या यात जोधपूर राजस्थान येथे संपन्न होण्यारा स्पर्धेत शालेय साँफ्टबॉल स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्य संघाची निवड करण्यात आली त्यामध्ये सौरभ दीपक वानखेडे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महाराष्ट्र संघात प्रवेश निश्चित केला*
*यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख,माजी आमदार आशिष देशमुख,डॉ अमोल देशमुख,पालक संचालक डॉ नटराजन,शाळेचे मुख्यधापक कृष्णकांत पांडे यानी केले.*

*सौरभ यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिलं तसेच क्रीडा प्रशिक्षक योगेश बन यांना दिले*

*शालेय विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड झाल्याने जवाहरलाल नेहरू हायस्कूलचे सर्व विद्यार्थी व क्रीडाप्रेमी मध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …