*आमदार सुनील केदार यांना मंत्रीपद द्या*

*सावनेर,रामटेक,कामठी,हिंगणा,कळमेश्वर,पारशिवनी,मौदा,उमरेड इत्यादी तालुक्यातील शेकडो ग्रामीण काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागणीचे प्रदेशअध्यक्ष थोरात यांना निवेदन सादर*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर –सावनेर विधानसभा क्षेत्राचे नव्हेतर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात कद्दावर काँग्रेसी नेते म्हणून सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांची ओळख असून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरिता अहोरात्र झटणारे तसेच सामान्य कार्यकर्त्यांच्या हाकेवर धावणारे जमिनी कार्यकर्ते म्हणून आमदार सुनील केदार यांची ओळख असून ग्रामीण भागात त्यांच्या मोठ्या जन आधारामुळे 2014 सली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींच्या अफाट लाटेत ही नागपूर जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते निवडून आले होते*
*आमदार सुनील केदार यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात सामील करून नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री पद दिल्यास नागपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अजून बळकट होऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल व येणाऱ्या नागपुर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला लाभ मिळेल या सर्व बाबी वरिष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून देत सुनील केदार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन नागपूर जिल्हा पालकमंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.*
*शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे,वरिष्ठ काँग्रेस नेते किशोर गजभिये,सुरेश भोयर,पवन जैस्वाल यांच्या नेतृत्वात विजय बसवार,गोपाल घटे,डोमासाव सावजी,मनोज बसवार,नगरसेवक दीपक बसवार,निलेश पटे,अश्विन कारोकार,चंदू कामदार,सोनू रावसाहेब,इमरान शाह सह शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज