Breaking News

कुही तालुक्यातील मानसीने तायक्वाण्डो स्पर्धेत पटकावले सुवर्ण.

कुही तालुक्यातील मानसीने तायक्वाण्डो स्पर्धेत पटकावले सुवर्ण.

निखिल खराबे(कुही शहर प्रतिनिधी)

कुही:- तालुक्यातील माळणी या लहानश्या गावातील मानसी निरंजन देशमुख या अवघ्या नवव्या वर्गातील विद्यार्थिनीने नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय तायक्वाण्डो स्पर्धेत सहभागी होऊन सुवर्ण पटकावून गावाचे तसेच तालुक्याचे नावलौकिक केले आहे , याच मानसीने आजवर तायक्वाण्डो मध्ये विदर्भ, जिल्हा व इतर स्पर्धांमध्ये 8 सुवर्ण , 6 रौप्य व 4 कास्य पदक पटकावले आहे.
मानसीच्या या कामगिरीचे कौतुक समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले तसेच ग्रामपंचायत माळणी तर्फे तिचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी प्रामुख्याने माजी पंचायत समिती सदस्य हरीश कडव ,माळणी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. शालिनी धांडे , सचिव कविता पुनसे , बाळाभाऊ भोयर, गजानन धांडे, सामाजिक कार्यकर्ते गौरव बावणे, निरंजन देशमुख यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गावातील अनेक मान्यवर तथा नागरिक उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …