*मालमत्ता कर वाढी प्रथम आक्षेपावर सुनावनी सुरु*


मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
*सावनेरः सावनेर नगर पालीके द्वारे सण 2019 ते 2023 या आर्थिक वर्षा करीता शहरातील मालमत्ता धारंकाच्या मालमत्तेचे पुनरमुल्यांकन करुण नव्याचे मालमत्ता कर आकरणी केल्याने मालमत्ता देयकात झालेल्या भरमसाठ करवाढीच्या विरोधात नगरीतील मालमत्ता धारकांनी आपले आक्षेप नोंदवीले होते त्या आक्षेपांचा निवाडा़ लावण्यासाठी आज दि.26 डिसेंबर पासुन नगर पालिकेचे मुख्याधिकारी व नगर रचना विभागाच्या कर्मचारी-अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम चरणाची सुनवाई नगर परिषद कार्यालयात सुरु खरण्यात आली आहे सदर सुनावणी करिता नगरवासीयात उत्साह व रोष दोन्हीही बघण्यात येत आहे*

*सदर सुनावणी करीता नगर पालीके कडून आक्षेप कर्त्यांना नोटीसी बजावून सकाळी 11-00वाजता आपले मुळ कागद पत्रा सह उपस्थित रिहण्याची विनंती करण्यात आल्याने आजच्या सुनावणीत आपले वाढलेले मालमत्ता देयक काही प्रमाणात कमी होऊण दिलासा मीळेल या आशेने नगरीतील मालमत्ता धारकांची गर्दी नगर परिषद कार्यालयात उसळू लागली.जसजशी सुनावणी पुढे सरकू लागली तर मालमत्ता धारकास तुर्तसा दिलासा मीळण्या ऐवजी आम्ही आपल्या मालमत्तेचे परत सर्वेक्षण करु असे फरमान सोडल्या जात असल्याने मालमत्ता धारकांत नाराजीचा सुर पणपत असुन याप्रसंगी त्यांनी निवडून दिलेल्या जनप्रतिनीधींनी ही सदर विषयावर कानाडोळा करत असल्याने हे वाढीव मालमत्ता देयक भरावे तर लागणार नाही ना असे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज