Breaking News

कॅन्सरग्रस्त महिलेला पत्रकार संघाकडून आर्थिक मदत.

कॅन्सरग्रस्त महिलेला पत्रकार संघाकडून आर्थिक मदत.

(मानव सेवा हिच ईश्वर सेवा/शासन योजनेचा लाभ मिळेना)

आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे

“मानव सेवा हिच ईश्वर सेवा” हा मूलमंत्र डोळ्यापुढे ठेवून कोरपना ता.ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने फुल नाही तर फुलाची पाकळी,म्हणुन एका कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदत देण्यात आली.कोरपना तालुक्यातील निमणी येथील सुनीता प्रकाश टेकाम असे कॅन्सरग्रस्त महिलेचे नाव असून हीला दोन लहान मुले व म्हातारी आई आहे.अठराविश्व दारिद्रयाचे जीवन जगत असलेल्या सदर महिलेला “एमिलोब्लास्टोमा” नामक कॅन्सर झाला आहे.हा आजार दिवसेंदिवस वाढत असून सेवाग्राम व इतर दवाखान्यात दाखविले असता लाखोंचा खर्च असल्याचे सांगण्यात आले.सदर कॅन्सर हा आजार शासनाच्या योजनेत बसत नसल्याने आर्थिक मदतीची आशाही मावळत चालली आहे.वैद्यकीय उपचारासाठी एवढी मोठी रक्कम नसल्याने कॅन्सर वाढतच चालला आहे.दिवसेंदिवस प्रकृतीत बिघाड होत असून सदर पीडित महिलाला लवकरात लवकर उपचाराची गरज आहे.मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या गरीब महिलेला कोणत्याही मार्गाने का होईना उपचारासाठी शासनाची मदत मिळवून द्यावी असे मत अनेकांनी व्यक्त केले असून गरजवंत,संकटग्रस्त,गोरगरीबांना मदत व न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या सदर पत्रकार संघाच्या सदस्यांचे या कार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.संघाचे अध्यक्ष दीपक खेकारेसह सैय्यद मूम्ताज़ अली,मयूर एकरे,गणेश लोंढे,हबिब शेख व निमणीचे उपसरपंच उमेश राजूरकर तसेच गावकऱ्यांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …