Breaking News

*अती दुर्गम भागात युवा मेळिव्याचे आयोजन*

*अती दुर्गम भागात युवा मेळिव्याचे आयोजन*

*पोलीस उप नीरीक्षक प्रदीप गायकवाड यांनी केले मार्गदर्शन*

अहेरी प्रतिनिधी – श्रीकांत दुर्गे

अहेरीपेरमिली हद्दीतील उपपोस्टे पेरमिली च्या वतीने अतिदुर्गम अशा मौजा ताडगुडा येथे भव्य युवा व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर जनजागरण मेळाव्यात दिनदयाल उपाध्याय कौशल्य योजनेचे नागपूर येथील श्री अक्षय कावणकुळे साहेब यांनी सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थीसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण व नोकरी संदर्भात महत्वपुर्ण माहिती दिली. प्रकल्प विकास कार्यालय अहेरीचे चव्हाण साहेब यांनी विविध सरकारी योजनांची माहिती दिली. तलाठी श्री मढावी यांनी ग्रामस्थांना शासकीय योजनांची व दाखल्याची माहिती दिली. आम्ही उपस्थित युवकांना आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच रोजगार मेळावा नाव नोंदणी बाबत माहिती देऊन सदर जनजागरण मेळावा मध्ये उपस्थित नागरिकांना गावासाठी बादल्या, घमेले लहान मुलांना वही व पेन वाटप करण्यात आले तसेच गावातील तरूणांना व्हाॅलीबाॅल व नेटचे वाटप करण्यात आले. तसेच उपपोस्टे पेरमिली वतीने राणी दुर्गवती हस्तकला स्पर्धा आयोजित करण्यात आली व विजेत्याना बक्षीस वाटप करण्यात आले. ग्रामस्थांनी मेळाव्यात मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली व आपल्या अडचणी सांगितल्या. उपस्थितांना जेवन देऊन मेळाव्याचा समारोप करण्यात आला. मेळाव्यात ताडगुडा, सकीनगट्टा, मिचगुंडा गावातील 100 ते 120 नागरिक सहभागी झाले होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …