*आला रे आला कोण आला,आमचा सुनील भाऊ आला चा जल्लोशात कँबीनेट मंत्री सुनील केदार यांचे नागपूर आगमन*
*हजारो कार्यकर्त्यांची उसळली अलोट गर्दी*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*
*सावनेरः मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार सोहळा विधीमंडळाच्या प्रंगणात पार पडला सदर मंत्रिमंडळात सावनेर कळमेश्वर विधानसभा सभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना कँबीनेट मंत्री म्हणून शपत घेतली व कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहचला.राज्य शासनाच्या मंत्रिमंडळात शामिल झालेले आपले लाडके आमदार आज कँबीनेट मंत्री बनून आपल्यात परत येत असल्याचे वु्त्त कार्यकर्त्यांना कळताच नागपूर विमानतळावर आपल्या लाडक्या नेत्याला एक नजर बघण्याची गर्दी उसळू लागली व मुंबई वरुण निघालेले विमान नागपूर विमानतळावर पोहचताच कार्यकर्ते सैरावैरा होऊण आपल्या नेत्याला एक नजर बघून शुभेच्छा देण्यास ललाईत होऊ लागले*
*विमानतळावरूण बाहेर पडताच आला रे आला कोण आला,आमचा सुनील भाऊ आला चा गगन भेदी नाद व सुनील भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,हमारा नेता कैसा हो सुनील भाऊ जैसा हो च्या नार्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेले व बघता बघता उपस्थित कार्यकर्त्यांनी सुनील बाबू केदार यांच्यावर फुलांचा वर्षाव करित पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देण्यास व स्वागत करण्याची होड कार्यकर्त्यात सुरु झाली कँबीनेट मंत्री पद प्राप्त होऊण प्रथमच आपल्या गु्ह नगरित पोहचल्यावर कार्यकर्त्यांन कडून झालेल्या जंगी स्वागत व कार्यकर्त्यांच्या मिळत असलेल्या प्रेमामुळे नवनियुक्त कँबीनेट मंत्री सुनील बाबू केदार एकदम भारावून गेले हे विशेष…*
*याप्रसंगी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रा सह संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते*