*कँबीनेट मंत्री सुनील केदार यांचे आपल्या कर्मभुमी असणार्या सावनेर नगरीत जंगी स्वागत*

*कँबीनेट मंत्री सुनील केदार यांचे आपल्या कर्मभुमी असणार्या सावनेर नगरीत जंगी स्वागत*


*शहर काँग्रेस,युवक काँग्रेस व सुनील केदार मीत्र परिवाराचे आयोजन*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*

*सावनेरः मागील 30 वर्षा पासून सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेची निस्वार्थ सेवा करुण जिल्हा परिषद सदस्य ते आमदार व आमदार ते कँबीनेट मंत्री पर्यंतच्या प्रवासातील सुखाःदुखःचे साक्षी असणारे सावनेर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या आशिर्वादाने आमदार सुनील केदार यांना प्रथमच महाराष्ट्र राज्य शासनात कँबीनेट मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने व कँबीनेट मंत्री बनल्यानंतर प्रथमच सावनेर नगरीत त्यांचे आगमन म्हणजे त्यांच्या चहेत्या कार्यकर्त्यांना जनुकाही नवीन वर्षाची भेटच असा दुग्ध-शर्करा योग आज दि.1 जानेवारीला सकाळी 12 च्या दरम्यान घडून आला*


*नुकतेच कँबीनेट मंत्री बनलेले आपले लाडले नेते प्रथमच सावनेर नगरीत येणार असल्याचेकळताच काँग्रेस कमेटी कार्यालय बस स्थानक परिसरात हुडहुडी भरणार्या बोचर्या थंडी सह वरुण पडणार्या रिमझीम पावसाच्या सरीत ही कार्यकर्त्यांचा उत्साह बघण्यायोग्य होता सुनील केदार यांचे आगमन होताच ढोल ताश्यांचा गजर,फटाक्यांची आतीषबाजी व पुष्पांचा वर्षाव अश्यात प्रत्येक कार्यकर्ताआपल्या लाडल्या नेत्याला जवळून बघण्यास व पुष्पगुच्छ देऊण स्वागत करण्यास ललाईत होता.मा.कँबिनेट मंत्री सुनील बाबु केदार यांनी बस स्थानक परिसरातील महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुण अभिवादन केले*


*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करत मा.कँबीनेट मंत्री सुनील केदार यांनी म्हटले की आपल्या व्दारे मिळालेले प्रेम व आशीर्वादाचे फलित असुन आता फक्त सावनेर विधानसभाच नव्हे तर संपूर्ण राज्याची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली असुन सदर संधीचे सोनं करुण अधिकाधिक विकासकार्य आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याचे आपले प्रयत्न राहील तसेच दि.7 जानेवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या उम्मेदवारांना बहुमताने निवडणूक आनने व जिल्हा परिषद व पंचायत समीत्या मधे महाविकास आघाडीची सत्ता स्थापीत करुण सुनील केदार यांची कँबीनेट मंत्री पदावरील नियुक्तीचे प्रमाणपत्र आपण सर्वांच्या मदतीने प्राप्त करत आपली नियुक्ती योग्य आहे हे सीध्द करावयाचे आहे असे ठाम मत व्यक्त केले*


*याप्रसंगी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,सचिव वीजय बसवार,वरिष्ठ अधिवक्ते श्रीकांत पांडे,व्यापारी संघाचे अध्यक्ष वीनोद जैन,नगर सेवक सुनील चाफेकर,दिपक बसवार,निलेश पटे,शपीक सैय्यद,अँड.युवराज बागडे,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,रामभाऊ उमाटे,गोपाल घटे,वरिष्ठ नेते डोमासाव सावजी,साहेबराव विरखरे,दिलीप घटे,युवक काँग्रेसचे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राजेश खंगारे,महासचिव इमरान शाह,चंदु कामदार,अश्वीन कारोकार,नाझीम शेख,साबीर शेख,युवराज टेकाडे,शमीम कुरैशी,दिलावर शेख,सुरज सावजी,सचिन मोहतकार,पत्रकार प्रा.बाबा टेकाडे,विजय पांडे,पीयूष झिंजुवाडीया इत्यादी प्रुख्याने उपस्थित होते*


*बस स्थानक परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी उसळणार असे अपेक्षित असल्यामुळे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहून कुणालाही सदर आयोजनाचा त्रास जानवलां नाही हे विशेष*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …