Breaking News

सुखकर्ता चिटफंड संचालक, खातेदारांसोबत एसडीपीओंची बैठक – न्याय न मिळाल्यास आत्मदहनावर ठाम

सुखकर्ता चिटफंड संचालक, खातेदारांसोबत एसडीपीओंची बैठक

(कारवाईच्या सुरुवातीमूळे आशा पल्लवित/मात्र न्याय न मिळाल्यास आत्मदहनावर ठाम)

आवारपूर प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना– तालुक्यातील गडचांदूर येथील सुखकर्ता चिटफंड प्रकरणात उशीरा का होईना मात्र कारवाईचे सुत्र हालायला सुरुवात झाली असून १ जानेवारी रोज बुधवारला उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशान्वये ठाणेदार गोपाल भारती यांनी सुखकर्ता चिटफंड संचालक व ग्राहकांना बैठकीसाठी पाचारण केले.एडीपीओ यामावार यांनी चिटफंड प्रकरणा संबंधी सखोल माहिती घेऊन येत्या ६ जानेवारी रोज सोमवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास चिटफंडचे आॅडीट तसेच व्यवहाराचे संपूर्ण दस्तावेज घेऊन येण्याचे चिटफंड संचालकांना सांगितले.या घडामोडींमुळे सदर प्रकरणात उशिरा का होईना परंतु कारवाईला सुरुवात झाल्याचे लक्षात घेऊन चिटफंडात गुंतवलेली रक्कम ग्राहकांना परत मिळणार असल्याची अशा पल्लवित झाली आहे.यानंतरही न्याय न मिळाल्यास आत्मदहनाच्या दिलेल्या ईशाऱ्यावर आम्ही ठाम असल्याची माहिती चिटफंड ग्राहक दीपक वर्भे यांनी News 34 ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.सुखकर्ता चिटफंडच्या अनेक ग्राहकांचे पैसे संचालक रोहित शिंगाडेसह इततर संचालक देत नसल्याने शेवटी ग्राहकांनी चंद्रपूर जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली होती.याचबरोबर वर्भे यांच्या नेतृत्वात नुकतेच गडचांदूर येथील गांधी चौकात थकीत रक्कम मिळावी आणि गुंतवणूक कायदा १९९९ अंतर्गत सुखकर्ता चिटफंड संचालकांवर पोलिस कारवाई व्हावी या मागणीला घेऊन एकदिवसीय अन्न त्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते हे मात्र विशेष.सदर बैठकीत सुखकर्ता चिटफंड संचालक रोहीत शिंगाडे,रोहन काकडे,बंडू वैरागडे,दीपक वर्भेंसह इत्यादींची उपस्थिती होती.चिटफंट ग्राहकांनी दिलेल्या ईशाऱ्यामुळेच पोलिस प्रशासनाकडून सदर प्रकरणाची दखल घेण्यात आल्याचा अंदाज वर्तविला जात असून आगामी काळात सर्व ग्राहकांची थकीत रक्कम परत मिळणार असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …