Breaking News

सिल्ली-तितुर जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारेल?

सिल्ली-तितुर जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारेल?

विशेष प्रतिनिधि- निखिल खराबे

कुही:- काही कारणांमुळे तब्बल सात वर्षाच्या नंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक लागल्या असून अनेकजण यावेळी या रिंगणात उतरून आपले नशीब आजमावून पाहत आहे. निवडणूक अर्ज सादर करण्यात आले असून काहींनी निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले तर काहींनी आपली भूमिका ठाम ठेवली आहे. गत वेळी सिल्ली-तितुर जिल्हा परिषद सर्कल मध्ये महिला राखीव असून सर्वच पक्षांच्या उमेदवारी साठी अनेक मातब्बर लोकांनी नशीब आजमावले असून यात अनेकांच्या हातात निराशा आली.
गत निवणुकीत भाजप तर्फे सिल्ली निवासी प्रमिला दंडारे , आकोली निवासी रेखा तिजारे व भाजप चे जुने निष्ठावंत दत्तू कुकडे यांच्या पत्नीत उमेदवारीकरिता चढाओढ होती पण माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.डॉ. सोनसरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू तसेच सर्कल मध्ये दांडगा परिचय असल्यामुळे दंडारे यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे . यात कुकडे यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला असून तिजारे ह्या अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. दुसरीकडे काँग्रेस तर्फे बाजार समिती उपसभापती तसेच काँग्रेस चे नेते सिल्ली निवासी महादेवजी जिभकाटे यांच्या पत्नी प्रेमीला जिभकाटे ह्या निवडणूक रिंगणात असून त्यांना काँग्रेस तर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे . जिभकाटे परिवाराचा सर्कल मध्ये चांगला जनसंपर्क असून सर्कल च्या कानाकोपऱ्यात त्यांचा जवळून संबंध आहे.
सर्कलमध्ये शिवसेनेची चांगली पकड ठेवली असून शिवसेना तालुका प्रमुख सातारा गाव निवासी हरीश कडव यांच्या पत्नी स्वतः या निवणुकीत सेनेतर्फे रिंगणात आहेत. गत जिल्हा परिषद निवडणुकीत प्रबळ दावेदार दिसत आहे. बसपा ने आपला उमेदवार दिला नसून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोनू तितरमारे ह्या आपले नशीब आजमावत आहे यात तितुर येथील समाजसेवक गजानन घोडमारे यांच्या पत्नी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ही काँग्रेससाठी फायद्याची बाब दिसून येत आहे व भाजपनेही निवणुकीसाठी कंबर कसली असून भाजपचा प्रचार जोरात सुरू आहे तर सेना तालूका प्रमुख हरिश कडव यांना सुद्धा सर्कल मध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत असल्याने गत निवडणुकीला चांगलाच रंग आल्याचे दिसत आहे. यामुळे निकालाच्या दिवशीच सिल्ली-तितुर सर्कल च्या लोकांनी कोनाच्या बाजूने कौल दिला आहे हे स्पष्ट होईल व कोण या सत्तासंघर्षात बाजी मारेल हे दिसून येईल.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …