Breaking News

*जि. प .व पं .स . चिचोली सर्कल मध्ये प्रचाराला सुरूवात*

*जि प व पं स चिचोली सर्कल मध्ये प्रचाराला सुरूवात*


*वातावरणात गारवा तर कुठे पावसाच्या सरीत उमेदवार मागत आहे मतदान*


*उमेदवारा मध्ये उत्सहाचे वातावरण मात्र मतदार उदास*
*उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बांशीन*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2020 तसेच 07/01/2020 ला जि प व पं स चे मतदान होत आहे त्याकरिता चिंचोली सर्कलचे उमेदवार सक्षम झालेले असून काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी , बहुजन समाज पार्टी यांनी युती केलेली आहे तसेच अपक्ष उमेदवार यांनी आपली उमेदवारी ही मागितलेली आहे चिंचोली सर्कल एक जिल्हा परिषद तसेच 2 पंचायत समिती चणकापूर पंचायत समिती चिचोली पंचायत समिती असे दोन उमेदवार आपले नशीब अजमावत आहे भारतीय जनता पार्टीचे व आठवले समर्थित जिल्हा परिषद उमेदवार कांताताई राजु परतेकी तसेच पंचायत समिती नीता जालंदर हे उमेदवार आहेत व चणकापूर पंचायत समितीचे समर्थित उमेदवार मनोज उदाराम धुर्वे तसेच वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी बहुजन समाज पार्टी युतीचे उमेदवार अश्विनी सुमित चव्हाण (सोनवाने) जिल्हा परिषद उमेदवार चिचोली पंचायत समिती उमेदवार करूणा संजय डाहाट चणकापूर पंचायत समिती उमेदवार रंजना उके तसेच काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद उमेदवार निलिमा कवडू उइके चिचोली पंचायत समिती अरूणा आनंद शिंदे तसेच पंचायत समिती चणकापूर चंद्रशेखर पदम
हे आपले नशीब अजमावत आहे उमेदवाराला अवधी कमी असल्या कारणामुळे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जनसामान्यांचा आशीर्वाद घेत आहे तसेच प्रचार स्पीकर गल्लोगल्लीत वाजत असल्याने मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे असं वाटत आहे आणि उमेदवार यांना कमी दिवस प्रचारासाठी मिळालेले असून प्रत्येक उमेदवारांनी कंबर कसलेली आहे प्रत्येक उमेदवार हे मतदारांच्या घरी जाऊन सर्वांच्या पाया पडत आहे बॅनर, बिल्ले देऊन त्यांना समजवुन सांगत आहे की येत्या सात जानेवारीला कोणत्याही पक्षाला बळी न पडता मलाच मतदान करावं मी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असे म्हणून लोकांना मत मागत आहे त्याचप्रमाणे चणकापूर पंचायत समिती मधुन उमेदवारी घेतलेले मनोज उदाराम धुर्वे यांना पंचायत समिती चनकापूर येथून उमेदवारी मिळालेली असल्याने जनसामान्य जनता मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे मनोज उदाराम धुर्वे हे सामाजिक कार्यकर्ते असून जनसामान्यांच्या मदतीला धावून येणारे इसम आहे ते जनतेचे समस्या सोडिवण्यात नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांना मध्यरात्री सुद्धा कोणी हाक मारली तरी ते धावून जायचे कोणाचे शाळेचे काम असो कोणाचे आरोग्याचे काम असो कोणाचे दाखले तयार करायची असो मनोज धुर्वे सक्षम आणि जबरदस्त उमेदवार पंचायत समिती चन्कापूर ला मिळाल्याने लोकांमध्ये एक खुशीचे वातावरण दिसून येत आहे मनोज यांच्या प्रचाराला प्रचंड अशी गर्दी दिसून येत आहे तसेच नारे निदर्शने जयघोष प्रचार रॅलीमध्ये उत्साहा दिसून येत आहे मनोज यांनी आपल्या भाषणात म्हणाले की जर मला तुम्ही निवडून दिले तुम्हाला येत असलेले प्राथमिक अडचणी मी दूर करण्याच्या प्रयत्न करील मला आपण पाच वर्ष जनसामान्यांची सेवा करण्याची संधी द्यावे हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो तसेच मनोज धुर्वे यांना उमेदवारी मिळाल्याने मनोजला उत्तम प्रतिसाद जनतेचा मिळत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …