Breaking News

के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर

सावनेरस्थानिक के.डी.पवार शिक्षण महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यानी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनपटावर आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच या दिना निमित् ” कविता स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला परिक्षक म्हणून स्थानिक के.डी.पवार बि.पी.एड. महाविद्यालयाच्या चौधरी मॅडम उपस्थित होत्या. या स्पर्धेमध्ये रोहीणी बुरहान हि विद्यार्थिनी प्रथम आली.कार्यकमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ .एस ए.घोडेस्वार,प्रमुख अतिथी म्हणून डाॅ .भाविका जैन मॅडम,उपस्थित होत्या. तसेच जे . हीरास मॅडम, माडेकर मॅडम, चौधरीमॅडम, बावणकर सर , देशमुख सर, फलके सर , लोणारे सर आदींची उपस्थिती होती.कार्यकमाचे संचालन अंकीता निचत हीने केले तर आभार पुष्पा यादव हिने मानले.राष्टृगिताने कार्यकमाची सांगता झाली.

 

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …