Breaking News

*प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ नाही*

*प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ नाही*

*महाराष्ट्र चित्ररथाचा 1993,94,95 व 2018 मधे प्रथम क्रमांक*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*

*प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथ दिसणार नाही महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या प्रस्ताव नाकारण्यात आला आहे*
*महाराष्ट्राने यावेळी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याच्या प्रस्ताव दिला होता मात्र प्रस्ताव नाकारण्यात आल्याने यावेळी राज्याच्या चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिसणार नाही* *दरवर्षी रोटेशन पद्धतीने काही राज्यांना संधी मिळते यंदा मात्र महाराष्ट्राच्या प्रस्ताव मंजूर झालेल्या नाही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये राजपथावर संचलनात सर्व राज्य चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा दर्शनाच्या प्रयत्न करत असतात महाराष्ट्राच्या चित्ररथाला आतापर्यंत सहा वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे 1993 1995 आणि 1995 अशी तीन सलग वर्ष महाराष्ट्राने हा पुरस्कार पटकावला होता तसेच 2018 मध्येही पहिला क्रमांक मिळाला होता*
*महाराष्ट्राने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथात साकारला होता* *राजपथावर संचलन करण्यासाठी दरवर्षी काही ठराविक राज्यांना संधी दिली जाते यावेळी सोळा राज्य आणि सहा केंद्रीय मंत्रालय अशा एकूण बावीस चित्ररथ यांचा समावेश करण्यात आला आहे*
*महाराष्ट्राचा चित्ररथ रोटेशन पध्दतीने नाकारण्यात आला का होईना सदर विषय हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला असुन यास महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदल शी जोडल्या जात असुन शिवसेनेचेखासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रियाव्यक्त करत म्हटले की महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारल्यावर ही भाजप गप्प का ? काँग्रेस पक्षाच्या राजवटीत असे घडले असते तर भाजपने बोंबाबोब केली असती असा टोला ही यावेळी दीला*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …