Breaking News

*मातोश्री सावित्रीबाई फुले जयंती,महिला मुक्ती दिवस म्हणून साजरी!!!*

*मातोश्री सावित्रीबाई फुले जयंती,महिला मुक्ती दिवस म्हणून साजरी!!!*

नागपुर जिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले

नागपुर– अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग द्वारा आज दिनांक ३ जानेवारी २०२० ला आद्य शिक्षिका मातोश्री सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिवस म्हणून विदर्भ आदिवासी विद्यार्थी वसतिगृह अंबाझरी टेकडी नागपूर येथे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना सोडूम महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती शुभांगी शेराम उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी विर बाबुराव शेडमाके युवा बचत गटाचे अध्यक्ष स्वप्नील मसराम,आदिवासी युवा शक्ती संस्थेचे अध्यक्ष विजय परतेकी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती शुभांगी शेराम म्हणाल्या की,मातोश्री सावित्रीबाई फुले ह्या खऱ्या अर्थाने महिलांच्या मुक्तिदात्या आहेत, शिक्षणा चे पवित्र द्वार त्यांनी महिला करिता उघडून दिले,त्यामुळे आज महिलांची प्रगती दिसून येते,आता आर्थिक सक्षमते कडे महिलांना अग्रेसर करणे आपले ध्येय असले पाहिजे तसेच त्यांचा आदर व सुरक्षा आपण करायला पाहिजे असा संकल्प या शुभ दिनी केला पाहिजे.उपस्थित मान्यवरांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले.संचालन दिनेश शेराम यांनी केले तर आभार गणेश करणाहके यांनी व्यक्त केली.

 

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …