*भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*दर वर्षी प्रमाणे या वर्षीही वर्धानदिनानिमित्त ४ जानेवारी २०२० रोजी रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. मात्र या वर्षी आपण चार संस्थांना आमंत्रित करण्यात आलेले आहेत.*
*🩸१ भारतीय सेनेची रक्त पेढी*
*🩸२ डागा इस्पितळ रक्त पेढी*
*🩸३ डॉ हेडगेवार रक्त पेढी*
*🩸४ रेन बो मेडीनोवा रक्त पेढी*

*भारतीय सेनेला राष्ट्र सेवेच्या भावनेतून, तर डागा ला सामाजिक बांधिलकी म्हणून आपण ५० बॅग रक्त देणार व त्या मोबदल्यात डागा मधील अत्यंत गरीब व गरजु अशा गर्भवती महिलांना हे रक्त निःशुल्क मिळेल याची व्यवस्था करू.*
*रेन बो मेडिनोवा आपल्याला रक्त दान शिबिराच्या दिवशी आरोग्य तपासणी शिबिर देत आहे, ज्यात आपल्याला दंत तपासणी, डोळे तपासणी, रक्त तपासणी अशा पाच तपासण्या फुकटात करून मिळतील. तसेच रेन बो मेडीनोवा येथे भविष्यात जर कोणत्या चाचण्या कराव्या लागल्या तर त्यातही १५ टक्के सूट मिळेल.*
*या व्यतिरिक्त आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार किंवा आपल्याला चुकून जर कधी रक्ताची गरज भासली तर नॅट टेस्टेड रक्त मिळावे म्हणून डॉ हेडगेवार रक्त पेढी.*
*तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या वर्षीही मोठ्या संख्येने रक्त दानात सहभागी व्हावे*
Maharashtra News Media सच की आवाज