Breaking News

अहो “नऊ कोटी,गेले कोठी” गडचांदूरकरांना पडला प्रश्न,विकासाचा तर सर्वत्र फज्जा

अहो “नऊ कोटी,गेले कोठी”

गडचांदूरकरांना पडला प्रश्न,विकासाचा तर सर्वत्र फज्जा

(मी वित्तमंत्री होतो,मला तिजोरीचा कोड नंबर माहित आहे,मुनगंटीवारांचे कॉर्नर सभेत वक्तव्य)

आवारपूर  प्रतिनिधि -गौतम धोटे 

कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर शहरात सध्या नगरपरिषद निवडणुकीचे वारे वाहत असून मोठमोठ्या नेत्यांच्या कॉर्नर सभेला सुरूवात झाल्याचे पहायला मिळत आहे.भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी ३ जानेवारी रोज शुक्रवारला गडचांदूर आठवडी बाजारातील न.प. संकूला समोर माजी वित्त,वन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कॉर्नर सभा पारपडली.मुनगंटीवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधी पक्षांचा खरपूस समाचार घेतला.विकास कामांसाठी जीवतीसह इतर शहरांच्या विकासासाठी करोडोंचा निधी उपलब्ध करून दिल्याची आठवण करून देत गडचांदूरला नऊ कोटी रुपये दिल्याचे भाषणाद्वारे सांगितले मात्र शहराची भकास अवस्था पाहून “नऊ कोटी,गेले कोठी” असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला असून शहराचे रूप बदलण्यासाठी भाजपचे सर्व उमेदवारांना निवडून आणा असे अपील मतदारांना करताना लोकसभा, विधानसभा निवडणूकीचे महत्व सांगताना स्थानिक पातळीवर उद्भवलेल्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी न.प.च्या निवडणुक महत्वाची कशी यासंबंधी माहिती दिली.”सत्ता नसताना विकास कसे करणार” अशा आरोपांना उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की “मी वित्तमंत्री होतो,मला तिजोरीचा कोड नंबर माहित आहे” तुम्ही चिंता करू नका नगरपरिषदेत भाजपची सत्ता आणा अभिमान वाटेल असे शहर बनवले शिवाय राहणार नाही.आपल्या २५ मिनिटाच्या भाषणात मुनगंटीवार यांनी मनसोक्त आश्वासनांची खैरात वाटली. मुनगंटीवार बोलत असताना उपस्थितांपैकी काही उपहासात्मकपणे टीकाटिप्पणी करताना दिसत होते तर आश्वासनांचे डोस पचणी पडत नसल्याने काही महिला व पुरूष सभा सोडून जाताना सुद्धा दिसून आले.सत्ता व तिजोरीच्या चाब्या हाती असताना काहीच केले नाही,मग आता काय करणार असे सुर वारंवार दबक्या आवाजात सभे दरम्यान उमटत होते हे मात्र विशेष.आता भाऊंच्या या सभेमुळे किती मतदार आकर्षित होतात हे निकालानंतरच कळेल.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …