Breaking News

*सावनेर मधे भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ*-*सुप्रसिद्ध प्रो.कबड्डी खेळाडू शशांक वानखडे व सारंग देशमुख यांच्या उपस्थिती

*सावनेर मधे भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ*

*सुप्रसिद्ध प्रो.कबड्डी खेळाडू शशांक वानखडे व सारंग देशमुख यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूत उत्साहाचे वातावरण*


*तालुका, जिल्हा व विदर्भ स्तरावरील खेळाडूचा सहभाग*


*पन्नास च्या वर संघाने घेतला भाग*


*एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर चे आयोजन*

सावनेर प्रतिनिधि -सुरज सेलकर
*सावनेरः एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर व्दारे संचालीत,एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर व्दारे दि.4 जानेवारी 2020 ते 5 जानेवारी2020 असे दोन दिवसीय भव्य क्रीडा स्पर्धा सुभाष प्राथमिक शाळा गडकरी चौक सावनेर च्या पटांगणात आयोजीत केल्या आहे*

*सदर स्पर्धेचे उदघाटन दि.4 जानेवारी ला मा.प्रवीण दटके (माजी महापौर ,अध्यक्ष एकलव्य क्रिडा मंडळ नागपूर व नागपूर शहर भाजप अध्यक्ष),मा.प्रशांत कामडे (महामंत्री भाजप नागपूर दक्षिण व उपाध्यक्ष एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर),यांच्या हस्ते मा.रामराव मोवाडे (सावनेर विधानसभा विस्तरक भाजप) यांच्या अध्यक्षतेत मा.शशांक वानखेडे (प्रो.कबड्डी खेळाडू),मा.सारंग देशमुख (प्रो कबड्डी खेळाडू),अँड् शैलेश जैन (माजी नगरसेवक)मा.रविन्द्र ठाकूर (शहर अध्यक्ष भाजप),आशीष मानकर (नगरसेवक व अध्यक्ष एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर) तेजसिंग सावजी (अध्यक्ष सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ),आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊण स्पर्धेला सुरुवात झाली*


*सदर स्पर्धेचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध “प्रो कबड्डी” सामन्यात शशांक वानखडे हे बँगलुरू बुल्स,तेलगु टाईटन,बंगाल वारियर्स तर सारंग देशमुख यांनी तमील तलायवा या संघाकडून खेळत आपल्या उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवनार्या खेळाडूंची प्रमुख उपस्थिती असणार असल्याने सदर आयोजनास क्रीडा प्रेमी व दर्शकाची लाक्षणिक गर्दी उसळणार असल्याचे मत एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर चे अध्यक्ष व नगरसेवक आशीष मानकर यांनी व्यक्त केले आहे.*


*सावनेर नगरीत प्रथमच आयोजित होत असलेल्या दोन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धेच्या यशस्वीते करीता ,आशीष मानकर (अध्यक्ष एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर),मनिष वाट,अश्विन देशमुख, कैलास बनकर,सचिन खुबाळकर,जगदिश बनकर,प्रविण सेवके,सचिन मोहतकार,अभिषेक सातपुते सह एकलव्य क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते व आशीष मानकर मीत्र परिवार परिश्रम घेत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …