*सावनेर कळमेश्वर तालुक्यात भाजप चा सुपडा साफ*

*केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या गु्ह नगरित ही भाजप पराभूत*

*केन्द्रिय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गु्ह जिल्ह्यात कँबीनेट मंत्री सुनील केदार यांची दमदार फटकेबाजी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या नागपूर जिल्हा परिषद निवडणूकीत कँबीनेट मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षा सोबतच महाविकास आघाडीच्या मीत्र पक्षांनी अभुतपूर्व विजय मीळवत संपूर्ण नागपूर जिल्ह्यात भाजपला भुईसपाट करुण जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन केली आहे*

*मतदानाच्या दिवसापर्यंत अतीतटीची दिसणारी ही निवडणूक प्राप्त निकालातून एकतरफा दिसू लागली व संपूर्ण जिल्ह्यात भाजप ला काही मोजक्याच जागेवर समाधान मानावे लागले हे विशेष*

*सावनेर विधानसभा क्षेत्रात क्षेत्राचे आमदार व कँबीनेट मंत्री सुनील केदार यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील एकूण 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती सदस्य निवडून आणत “यहा के हम सिकंदर” असे दाखवून देत दोन्हीही पंचायत समीत्या सोबतच जिल्हा परिषदेच्या संपूर्ण जागा निवडून आनत जनुकाही सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र हे भाजप मुक्त करत भाजप ला मोठा हादरा दीला आहे*
*सावनेर तहसील कार्यालयात पार पडलेल्या मतमोजनी परिसरात सकाळपासुनच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी याकरिता सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हर्षल ऐकरे,पीआय फुलकर,पाटील, आवळा,जुनुनकर सह जवळपास 105 महिला पुरुष पोलीस कर्मचारी अधिकार्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने विजयी उम्मेदवारांना व कर्यकर्त्यांना विजय उत्साह साजरा करण्यात व पराभूत उम्मेदवार व त्यांच्या समर्थकांना कोणत्याही वाईट प्रसंगास पुढे जावे लागले नाही*

*मत मोजनी कक्षात निवडणूक अधिकारी अतुल म्हेत्रे,उप निवडणूक अधिकारी व तहसीलदार दिपक कारंडे,नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्या नेतृत्वात एकूण 17 टेबलावर मतमोजनी करण्यात येऊन निकाल घोषित होताच विजयी ऊम्मेदवार व समर्थकात उत्साहाचे तर पराभूत उम्मेदवार व कार्यकर्त्यात निराशेचे वातावरणात स्पष्टपणे दिसून येत होते*

*सावनेर तालुक्यातील सहा जिल्हा परिषदे चे विजयी उम्मेदवार*
*१) बडेगाव : छाया चंद्रशेखर बनसिंगे (काॅग्रेस) : ८७१९*
*२) वाकोडी : ज्योती अनिल सिरसकर ( काॅग्रेस) :८०४१*
*३) केळवद : मनोहर शंकर कुंभारे (काॅग्रेस) :७६९८*
*४) पाटणसांवगी : मुक्ता विष्णु कोक्कडे (काॅग्रेस) :१०९६९*
*५) वलनी : प्रकाश नथ्थुजी खापरे (काॅग्रेस) :६२०८*
*६) चिचोली : निलिमा अश्विन उईके (काॅग्रेस) : ७५७५*
*पंचायत समीती सावनेर चे विजयी उम्मेदवार*
*१)बडेगाव : भावना अरुण चिखले (काॅग्रेस) :३८५२*
*२)वाकोडी : प्रकाश लक्ष्मण पराते (काॅग्रेस) :३६९२*
*३)खुबाळा : गणेश गुलाबराव काकडे (काॅग्रेस) :५३२८*
*४)वाघोडा : ममता प्रकाश केसरे (काॅग्रेस) :४७८३*
*५(केळवद : माया नरेश पाटील (काॅग्रेस) :४१५१*
*६)नांदागोमुख : गोविंदा बारकु ठाकरे(काॅग्रेस) :३५९४*
*७)पाटणसांवगी : रमेश लहानु हाडके : ४१०८*
*८)पिपळा डां ब. : जिजाबाई देविदास बागडे (काॅग्रेस) : ५०१०*
*९)वलनी : पुष्पा सुरेश करडमारे (काॅग्रेस) :३४१८*
*१०) सिलेवाडा : राहुल ब्रिजभुषन तिवारी (काॅग्रेस) : २५५१*
*११)चिचोली :अरुणा आंनद शिंदे (काॅग्रेस) :३७९६*
*१२) चनकापुर : चंद्रशेखर जागोजी पदम(काॅग्रेस):३०३४*
Maharashtra News Media सच की आवाज