Breaking News

*गडचिरोली जिल्हा परिषद सभापतींची निवडणूक १६ जानेवारीला*

*गडचिरोली जिल्हा परिषद सभापतींची निवडणूक १६ जानेवारीला*

विशेष प्रतिनिधि

गडचिरोलीजिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक १६ जानेवारीला घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.

१६ जानेवारीला दुपारी २ जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शेडमाके सभागृहात सभा आयोजित करण्यात आली असून, त्यात सभापतींची निवड करण्यात येणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी(भूसंपादन)धनाजी पाटील यांनी नेमणूक करण्यात आली आहे.

३ जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यात काँग्रेस-आविसं आघाडीने भाजपला सत्तेतून पदच्युत केले. अध्यक्षपदी अजय कंकडालवार, तर उपाध्यक्षपदी मनोहर पोरेटी यांची विजयी झाले. त्यांना भाजपच्या चार सदस्यांचे पाठबळ मिळाले होते. त्यामुळे सभापतींच्या निवडणुकीत हेच समीकरण राहते की बदलते, याकडे राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …