Breaking News

*कळमेश्वर तालुक्यातील जी.प.व पंचायत समिती कॉग्रेसच्या ताब्यात*

*कळमेश्वर तालुक्यातील जी.प.व पंचायत समिती कॉग्रेसच्या ताब्यात*

*कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या प्रयत्नांना यश*

*विशेष प्रतिनिधी सतीश नांदे कळमेश्वर*
कळमेश्वर – तालुक्यात पार पडलेल्या जी. प. व पंचायत समिती निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत कॉग्रेसने ३ जी प.व ६ पंचायत समिती गनावर एकहाती विजय मिळवीत शिवसेना, भाजपा, अपक्ष व इतर पक्ष उमेदवारांना बाजुला सारत निर्विवाद यश प्राप्त केले. यामुळेच तालुक्यात सर्वत्र कॉग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. आज पार पडलेल्या मतमोजणीत गोंडखैरी जी प मधून काँग्रेसचे देवानंद कोहळे यांना ७८२३ तर भाजपचे रवी भलावी यांना ३५८३ मते मिळाली.धापेवाडा जि. प.मधून कॉग्रेसचे महेंद्र नारायण डोंगरे यांना ९४४४ तर भाजपचे मारुती सोमकुवर यांना ५५०१ मते मिळाली , तेलकामठी जि. प. मधून काँग्रेसच्या पिंकी उल्लाहास कौरती विजयी झाल्या.यांना९८६९ मते तर भाजपा च्या बेबीताई धुर्वे यांना ५४५० मते मिळाली. तर तालुक्यातील ६ पंचायत समिती गणामधूनही ६ ही उमेदवार काँग्रेसचे विजयी झाले . यामध्ये गोंडखरी गणातुन प्रभाकर केसरीलाल भोसले यांना ३५५७ मते तर भाजपचे गजानन वाघाडे यांना १८०६ मते मिळाली. सेलू विजय भांगे यांना ३९२५ तर भाजपचे सुरेश गायकवाड यांना २२१५ मते मिळाली. धापेवाडा जयश्री वाळके यांना४५१६ मते मिळाली तर भाजपचे प्रीती कोठाडे यांना ३००५ मते मिळाली. उबाळी वंदना बोधाने यांना ३७०० तर शिवसेनेच्या वैशाली ठाकूर यांना २५६४ मते मिळाली. कोहळी श्रावनदादा भिंगारे यांना ४११२ तर भाजपचे रुपराव भिगारे यांना २६०९ ,तेलगाव मालती धनराज वसू विजयी झाल्या त्यांना ४९५४ मते तर भाजपच्या सीमा जीवतोडे३१६१ मते मिळाली. विजयी उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याची आतिषबाजी करित गुलालाची उधळण केली. आज पुन्हा काही वर्षानंतर कॉग्रेसचे झेंडे सर्वत्र लहेरताना दिसत होते. सर्वत्र कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांच्या मेहनतीची आणि कार्यकर्त्यांच्या जोशांची चर्चा होताना दिसून आली.


माजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे :पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार
पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे मागच्या पाच वर्षात माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यांमध्ये ताकत लावली स्वतःच्या मतदारसंघात त्यांना मिळालेले मतदान फार बोलके आहे पाच वर्षांमध्ये लोकांसाठी लोक हिताकरिता त्यांनी कोणती कारवाई केली यासाठी त्यांनी आत्मचिंतन करावे तसेच निकाल हाती आलेल्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा मोठ्या प्रमाणात हाती आल्या जनतेने दिलेला हा कौल लक्षात घेता माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात सत्ता कुणासाठी वापरल्या गेली आणि पक्ष संघटन कसे काय बळकट केले याबाबत आत्मचिंतन करावे असा सल्ला प्रतिक्रिया देताना पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी या निकाला प्रसंगी दिली.
नागपुर जिल्हापरिषद निवडणुकित भाजपा चा झालेला पराभव धक्कादायक .डॉ पोतदार अध्यक्ष भाजपा नागपुर जिल्हा ग्रामिण

आज नागपुर जिल्हापरिषद व १३ पंचायत समिती च्या निवडणुकिचे निकाल समोर आलेत.
एकंदर आम्हाला अतिशय धक्कादायक अश्या पराभवाचा सामना करावा लागत आहे.आम्हाला आत्मपरिक्षण करण्यासाठी भाग पाडणारा असा हा पराभव आहे.विधानसभा निवडणुकीनंतर गेली २ महीण्यापासून मा.श्री.बावनकुळेे साहेब यांना प्रदेश भाजपा तर्फे जिल्हा परिषद् निवडनुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्यांच्या नेतृत्वात जिल्हा भर केलेली प्रचंड मेहनत, सर्व जिल्हा परिषद् सर्कल निहाय मेळावे,दौरे जिल्हा भाजपा च्या पदाधिकारी टीम ने केलेले एकंदर कार्य ,घरोघरी जाऊन केलेला प्रचार,अनेक लहान मोठ्या नेत्यांच्या सभा ,व सर्व जाती, धर्म ,पंथ यांना सोबत घेउन कार्यकर्त्याना विश्वासात घेउन अंतिम सर्वेक्षनाच्या आधारावर दिलेले उत्तम उमेदवार तसेच निवडणुकिचे सु- व्यवस्थापन व सु -नियोजन एवढे सर्व करुनही आम्ही पाहिजे तसे यश संपादित करू शकलो नाही यांची ख़त आहे.


राज्यात नव्याने झालेले सत्ता परिवर्तन त्यांतुन नागपुर जिल्ह्यात कांग्रेस,राष्ट्रवादी कोंग्रेस कड़े ३ नविन मंत्री पदे ,या मुळेे सुद्धा आम्हाला फार मोठा फटका बसला आहे.या निकाला नंतर मी नागपुर जिल्ह्यातील समस्त भाजपा कार्यकर्त्याना असे आव्हान करितो कि,आपण निराश ,हाताश न होता पुन्हा एकदा नव्या दमाने,नव्या उमेदीने पक्ष कार्य अजुन मजबुत करुन पुढील काळात मोठे यश संपादन करू.परत एकदा हा पराभव स्विकार करुण मी नागपुर जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार मानतो.

*कळमेश्वर तालुका*
*जिल्हा परिषद तेलकामठी सर्कल*

पिंकी उल्हास कौरती ९८६९ (काँग्रेस)

बेबीताई रामरावजी धुर्वे ५४५० (भाजपा )

प्रतिभा सुर्यभान मडावी ७१० ( शिवसेना )

+++++++++++++++++++++++++++
*जिल्हा परिषद धापेवाडा सर्कल*

महेंद्र नारायण डोंगरे ९४४४ (काँग्रेस)

जितेंद्र दिलीप मेश्राम ५४३(बहुजन मुक्ती पार्टी)

मुकेश सूर्यवंशी ४०५ (भारिप बहुजन महासंघ)

मारुती नारायण सोमकुवर ५५०१ (भाजपा)

युवराज नारायण हनवते २१८८ (शिवसेना )

+++++++++++++++++++++++++++
*जिल्हा परिषद गोंडखैरी सर्कल*

देवानंद दौलत कोहळे ७८२३ (काँग्रेस)

मनोहर भाऊराव घोडमारे १६२८ (शिवसेना)

रवी सदाराम भलावी ३५८३ (भाजपा)

प्रशांत सुर्यभान मडावी २०६५ (अपक्ष)
कळमेश्वर तालुका

*जिप तेलकामठी सर्कल*

पंचायत समिती तेलकामठी गण

सीमा संजय जीवतोडे ३११६ (भाजपा)

स्वाती प्रकाश निंबाळकर ६१९ (शिवसेना)

मालती धनराज वसू ४९५४ (काँग्रेस)

*पंचायत समिती कोहळी गण*

रुपराव बळवंतराव भिंगारे २६०९(भाजपा)

श्रावण महिपतरावजी भिंगारे ४११२ (काँग्रेस)

भुजंग गंगाराम मोजनकर ३७४(शिवसेना)

***********************
जिप धापेवाडा सर्कल

*पंचायत समिती धापेवाडा गण*

प्रीती मंगेश कोठाडे ३००५ (भाजप)

अर्चना ईश्वर खेरगडे ४१५(बहुजन मुक्ती पार्टी )

भाग्यलक्ष्मी प्रभाकर ठाकरे १११९ (शिवसेना)

जयश्री मनीष वाळके ४५१६ (काँग्रेस )

*पंचायत समिती उबाळी गण*

वैशाली प्रकाश ठाकूर २५६४ (शिवसेना)

मनीषा राजेंद्र पिंपळशेंडे १९३० (भाजप)

वर्षा रविंद्र बनसोड ५८२ (भारिप-बहुजन महासंघ)

वंदना सुरेश बोधाने ३७०० (काँग्रेस)

++++++++++++++++

जिप गोंडखैरी सर्कल

*पंचायत समिती गोंडखैरी गण*

प्रभाकर केसरीलाल भोसले ३५५७ (काँग्रेस )

सुमन सावळाराम मडावी। ९१५ (शिवसेना)

गजानन माधवराव वाघाडे १८०६ (भाजपा)

भीमराव रामदास सलाम ६८१ (अपक्ष )

*पंचायत समिती सेलू गण*
तज
मधुकर तुकाराम खांडेकर १३७६ (अपक्ष )

सुरेश हिरामण गायकवाड २२१५ (भाजपा)

प्रमोद मनोहर भोतमांगे ४२७ (बहुजन मुक्ती पार्टी )

विजय बळीरामजी भांगे ३९२५ (काँग्रेस)

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …