*अतिदुर्गम,अतिसंवेदशील,नक्षलग्रस्त, रामेशगुडाम, किष्ठाय्यापली,कार्जेलीत पोहचली विकासाची गंगा*
* जिल्हा परिषद गडचिरोलीचे महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम पोहचली अतिदुर्गम भागात.
* सभापती जनगाम यांचे प्रयत्नाने रामेशगुडाम परिसरात 40 लाख रुपयांचे विकास कामाचे भूमिपूजन.
विशेष प्रतिनिधि-
गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचा तालुका म्हणजे सिरोंचा हे अतिदुर्गम,अतिसंवेदनशील,नक्षलग्रस्त आहे.तालुक्यात आजही असे गावे आहे,त्या गावामध्ये वर्षातून 4 महिने बस चालतो.उर्वरित 8 महिने जीव धोक्यात टाकून खाजगी वाहनाने जीवघेणी प्रवास करत तालुका मुख्यलाय पोहचवी लागते.ते गावे म्हणजे कोरला,रमेशगुडाम,किस्टय्यापली,कार्जेली हे आहेत.हे गावे इंद्रावती नदीच्या काठावर वसले असून, याभागात सहसा कोणी लोकप्रतिनिधी व शासन जात नाही, कारण यागावमध्ये जायला बस सुविधा नाही,फाक्के रस्ते नाहीत.म्हणून हे गावे अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दूर गेले होते. जिल्हा परिषद गडचिरोलीचे महिला व बाल कल्याण समितीचे सभापती जयसुधा जनगाम आणि आदिवासी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बानय्या जनगाम याना रामेशगुडाम परिसरातील नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या सांगितले.प्रमाणे सभापती जनगाम यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे मागणी करून चाळीस लाख रुपयाचे विकासकामे मंजुरी करून आणले आहे.
काल दिनांक 7 डिसेंबर रोजी ग्राम पंचायत रामेशगुडाम अंतरंगात रामेशगुडाम,पल्लीगुडाम,किष्टय्यापली यागावमध्ये जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत दोन नवीन अंगणवाडी इमारती,एक जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्ग खोली असे एकूण चाळीस लाख रुपयेचा विकास कामाचे सभापती यांनी शासनाचे योजने समान्या जनतेप्रयन्त पोहचावे म्हणून स्वतः अतिसंवेदशील,अतिदुर्गम,नक्षलग्रस्त गावामध्ये पोहचून रमेशगुडाम परिसरात सभापती जनगाम यांचे हस्ते या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून याभागात कोणी लोकप्रतिनिधी गेले नसल्याने अचानक याभागात सभापती पोहचल्याने सभापतीला पाहून गावकरी भावुक झाले आहेत. आणि परिसरात विकास कामे होत असल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत आहेत.पुढे याभागात अजून अनेक विकास कामे जिल्हा परिषद अंतरंगात करण्यात येईल असे उपस्थित नागरिकांना सभापती जनगाम यांनी विस्वास करून दिली आहे.
यावेळी आदिवासी विध्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम, माजी सरपंच सिंगा मडावी,दुर्गेश लांबडी,बाबुराव कुंमरी,सुरेश कुंमरी,सदानंदम दुर्गम,चंद्रकांत नैताम,रामन्ना कोंडगोरला,लक्ष्मण बोल्ले,तिरुपती कुंमरी,रामुलु नैकुल,आनंदराव नीलम,सुभाष सडमेक,मासा मडावी,शंकर सडमेक,शंकर मडावी,आनंदराव दुर्गम,शंकर गावडे,निलेश सडमेक सह रमेशगुडम परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज