Breaking News

*पतंजलि चा 25 वा स्थापना दिवस व भारत स्वाभिमान चा 11 वा वर्धापन दीन साजरा*

*पतंजलि चा 25 वा स्थापना दिवस व भारत स्वाभिमान चा 11 वा वर्धापन दीन साजरा*

*विशेष प्रतिनिधी लातूर*

*पतंजलि परिवार का रजत जयंती महोत्सव व भारत स्वाभिमान चा 11 वा वर्धापन दिन लातूर येथील पतंजलि मेगा स्टोरच्या प्रांगणात अति उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी यज्ञ होम हवन करून संपन्न झाले आचार्य डॉ. स्वामी देवव्रत सरस्वती जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितित लोकनेते माननीय शिवाजीराव पाटिल साहेब यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम संपन्न झाला. पतंजलि योग समिति चे प्रांत प्रभारी विष्णु भूतड़ा, प्रांत संगठन मंत्री दत्ता जी काले, जिल्हा प्रभारी राम जी घाडगे, आर्य समाजाचे प्रधान शंकरराव मोरे, आर्य वीर दल के महाराष्ट्र अधिष्ठाता वेंकटेश हालिंगे, जिल्हा संरक्षक पांडुरंग कचोलिया, मेगा स्टोरचे संचालक नारायण भूतड़ा, डॉ. व्यंकटेश सिद्धेश्वर , ज्ञानेश्वर पाटिल, डॉ. जगन्नाथ यरोलकर, बाबासाहेब सूर्यवंशी, राजाभाऊ खंदाडे, शिवाजी वाघमारे, बृजमोहन दायमा, इत्यादीदि प्रमुख्याने उपस्थित होते*
*याप्रसंगी पतंजलि योग समीतीचे प्रांताध्यक्ष विष्णूजी भुतडा यांनी प.पू. योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज व आचार्य बालकु्ष्णजी यांच्या पुरुषार्थाने पतंजलि योग पीठ हरिव्दार व्दारे मागील 25 वर्षांत केलेल्या लोकाभीमुख कार्याचे तसेच फक्त भारत देशच नव्हे तर संपूर्ण विश्वात योग,संस्कृती, अध्यत्म,आयुर्वेद,नैसर्गिक उपचार पध्दती,सेवा संस्कार आदीला पुर्नजिवीत करुण करोडो लोकांना आरोग्य लाभ देण्याचे पुण्यकार्य पतंजलि योग पीठाच्या माध्यमातून पतंजलि योग समितीचे सर्व कार्यकर्ते निस्वार्थ भावनेनी आजही करत आहे.सोबत स्वदेशी व आयुर्वेद च्या माध्यमातून लाखो लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुण देण्याचे भरीव कार्य पतंजलि परिवार करत आहे व येणार्या काळात पतंजलि फुड़ पार्क च्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचे कार्य लवकरच मुर्त रुप घेणार असल्याने याप्रसंगी बोलुन दाखवीले*
*याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित पतंजलि योग पीठ हरिव्दार वरुण आलेले प.पू.स्वामी रामदेवजी महाराज यांचे कु्पापात्र आचार्य डॉ.देवव्रतजी सरस्वती महाराज यांनी पतंजलि योग पीठ हरिव्दारच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत पतंजलि योग समिती,भारत स्वाभिमान, महिला पतंजलि,युवा भारत व किसान सेवा समिती महाराष्ट्र पुर्व च्या सर्व प्रांत प्रभारी,पदाधिकारी, महाराष्ट्र पुर्वच्या संपूर्ण 16 जिल्ह्याच्या सर्व जिल्हा प्रभारी,तसेच तालुका समित्या व्दारे सुरु असलेल्या कार्यवर समाधान व्यक्त करत प.पु स्वामी रामदेवजी महाराज व आचिर्य बालकुष्णजी यांच्या संकल्पना व पतंजलि योग पीठ हरिव्दार चे आगामी उपक्रमाबद्दल माहीती दीली*


*कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतंजलि मेगा स्टोर चे संचालक नारायण भुतडा यांनी तर संचालन आर्य विर दलाचे महाराष्ट्र अधिवक्ते वेंकटेश हालिंगे यांनी तर आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले पतंजलि परिवाराच्या रजत जयंती कार्यक्रम व भारत स्वाभिमान च्या 11 वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास पतंजलि परिवाराचे शेकडो पदाधिकारी ,कार्यकर्ते व साधक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …