Breaking News

*कँबीनेट मंत्री सुनिल केदार यांनी स्वीकारला कार्यभार*

*कँबीनेट मंत्री सुनिल केदार यांनी स्वीकारला कार्यभार*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*


*स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊण आई साहेबांच्या स्मृतीस अभिवादन तसेच मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चलचित्राला पुष्प व माल्यार्पन करुण घेतला कक्षात प्रवेश*

मुंबई : मंत्री सुनिल केदार यांनी आज पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण विभागाचा कार्यभार स्वीकारला. मंत्रालयातील मुख्य इमारतीतील दालन क्र.201 हे त्यांचे कार्यालय आहे. पदभार स्वीकारताना माजी आमदार राजू तिमांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री.केदार म्हणाले, मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो तेव्हा माझे स्व.माँसाहेब मिनाताई ठाकरे यांनी औक्षण करुन मला आशिर्वाद दिला होता. पदभार स्वीकारण्यापूर्वी मी स्व.मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. आजही पदभार स्वीकारल्यानंतर स्व.मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री.केदार म्हणाले, माझ्याकडे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण या खात्यांचे मंत्रीपद मिळाले असून या माध्यमातून राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. युवकांच्या कल्याणासाठी प्राधान्य देऊन राज्याच्या विकासासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पदभार स्वीकारण्यापूर्वी श्री. केदार यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन वंदन केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …