*कळमेश्वर ब्राह्मणी पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपा विजयी*

*जि प आणि पं स. च्या काँग्रेस पक्षाचा ग्रामीण भागातील विजय बघता शहरी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह*
*तालुका प्रतिनिधी कळमेश्वर*
कळमेश्वर दिनांक 10जानेवारी 2020तालुका प्रतिनिधी
कळमेश्वर ब्राह्मणी नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार पोटनिवडणुकीत भाजपचे सुनील चुनारकर हे 825 मतांनी विजयी झाले आहेत. पोटनिवडणुकीसाठी दिनांक 9 जानेवारी 2020 रोजी मतदान घेण्यात आले होते. यावेळी 61.01 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आशिष कुकडे,भाजपकडून सुनील चुनारकर, तर अपक्ष उमेदवार म्हणून मुकेश भरके यांनी उमेदवारी दाखल केली होती. आज दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता नगरपालिकेच्या म्युनिसिपल हायस्कुल मध्ये मतमोजणी झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार सुनील चुनारकर यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आशिष कुकडे यांच्यावर 825 मतांनी विजयी मिळवला. सुनील चूनारकर यांना 3336 तर आशिष कुकडे यांना 2511 मते मिळाली. या पोटनिवडणुकीमध्ये एकूण दहा बूथ ठेवण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार सुनील चुनारकर हे जुन्या वस्तीमध्ये राहतात तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार आशिष कुकडे हे नवीन वसाहतीमध्ये राहतात.जुन्या वसाहतीमध्ये मतदानाची टक्केवारी नवीन वसहतीपेक्षा जास्त झाली.नवीन वसाहतीमध्ये असलेल्या बूथ वर मतदानाची टक्केवारी सुरुवातीपासूनच कमी राहिली.यात दोन्ही उमेदवार शहराच्या दोन भागात विभागल्या गेल्याने जुन्या वसाहतीतील नागरिकांनी नवीन वसाहतीच्या तुलनेत सुनील चुणारकर जास्त मते दिली.नवीन वसाहतीच्या लोकांमध्ये या पोटनिवडणुकीत पाहिजे तसा उत्साह दिसून आला नाही. सुरुवातीपासूनच विजयी उमेदवार चुनारकर यांनी ब्राह्मणी गावच्या जुन्या वस्तीमधून काँग्रेसचे उमेदवार आशिष कुकडे यांच्यावर 993 इतक्या मोठ्या मताधिक्याने आघाडी घेतली. बूथ प्रमाणे निकाल असा आहे.
सुनील चुणारकर आशिष कुकडे
311 500 241
312 433 237
313 462 139
314 401 186
315 313 285
316 154 317
317 221 289
318 268 417
319 277 182
320 307 218
2511. 3336
सर्वत्र ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचा विजय झाला असताना कळमेश्वर ब्राम्हणी शहराच्या पोटनिवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागला असल्याने कळमेश्वर ब्राम्हणी शहराच्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने आत्मचिंतन करून नेतृत्वावर लागलेल्या प्रश्नचिन्हाचे उत्तर शोधावे लागणार आहे हे विशेष.
Maharashtra News Media सच की आवाज